
पुसद :-वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शब्दवेध या वार्षीक अंकाचे प्रकाशन सोहळा पार पडला गेला.युवक मंडळद्वारा संचलित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शब्दवेध हस्तलिखितअंकाचे प्रकाशन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या उद्घाटन राज्यमंत्री आ.इंद्रनिल नाईक यांनी केले. या कार्यक्रमांचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी अध्यक्ष आशिष बिजवल होते .तर प्रमुख आतिथी उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे.,अँड मोहीनी नाईक, बी. डी ओ. संजय राठोड ,गटविकास अधिकारी संजय कांबळे, न.प. प्रशासन अधिकारी धीरज आडे,युवक मंडळाचे सचिव विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्रांती कामरकर, कृषी भूषणदिपक आसेगावकर, जांबवत राठोड, यांच्या उपास्थित शब्दवेध या हस्तलिखित स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
या शब्दवेधाकचे संपादक प्राचार्य अनिल कुरमे ,उप संपादक विजय राठोड, सहसंपादक प्रा. शेषराव राठोड यांनी हस्तलिखित संपादन केले आहे. या हस्तलिखित मध्ये मराठी ,हिन्दी, इंग्रजी विभागत लेख, अग्रलेख, चिंतन, हास्य -विनोद , चरित्र लेखन, शेतकऱ्यांची दुरावस्था,चरित्र लेखन ,सामान्य ज्ञान विनोद, कथा कविता या हस्तलिखित समाविष्ट केले आहे . या हस्तलिखिता करिता शिवशंकर घरडे ,सुबोध बहादुरे, राजेश बुरबुरे, प्रा. नरेश राठोड कु.वंदना पोले प्रा. आर के डेकाटे, संजय राठोड, अभिजीत राठोड , अविनाश राठोड, बाळासाहेब कराळे, भूमेश्वर डोक, महेश चव्हाण, विष्णू इंगळे, पांडुरंग जाधव, अमोल राठोड, युवराज जाधव यांचे अथक परिश्रम लाभले.