
☰

पुसद वार्ता –माँ जगदंबा माता संस्थान येरावार ले आऊट ईटावा पुसद तर्फे वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले श्री.बाबुलाल जाधव, श्री.गोकुळ राठोड व ज्यांच्या मार्गदर्शनाने 54 विद्यार्थी शासकीय सेवेत लागल्यामुळे विद्या इन्स्टिट्यूट चे संचालक श्री.ज्ञानेश्वर अजमिरे साहेब यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बाजड सर( माजी प्राचार्य,कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, वरुड) होते.तर प्रमुख अतिथी म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळ सूतगिरणी पिंपळगाव चे मुख्याध्यापक श्री.सि.आर.कोडापे सर व रामू नाईक विद्यालय वरुड येथील प्रा.श्री संतोष चव्हाण सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात माँ जगदंबा माता प्रतिमेचे पूजन व आरती करून सुरवात झाली .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामू नाईक विद्यालय वरुड चे प्रा.श्री.संतोष चव्हाण सर यांनी केले,त्यांनी तिन्ही सत्कार मूर्ती च्या कार्याचा गुणगौरव केला.व जगदंबा माता संस्थान चे पदाधिकारी विविध कार्यक्रम व उपक्रम माँ जगदंबा माता संस्थान मध्ये साजरे करतात या मुळे माणुसकी कुठेतरी जिवंत आहे याविषयी आपले भाव प्रकट केले.तसेच श्री.सि. आर.कोडापे सर यांनी श्री.गोकुळ राठोड हे माझे परम मित्र आहे त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये तन -मन-धनाने सेवा केली. व पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
मा.श्री.अजमिरे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये माँ जगदंबा संस्थ्यानचे पदाधिकारी खूप चांगले कार्य करत आहे अशा सत्काराच्या कार्यक्रमामुळे एक नवीन चेतन्या सारखी ऊर्जा मिळते.व एक कुठेतरी आपल्या कार्याची पावती मिळते असे आपले भाव प्रकट केले, श्री. बाबुलाल जाधव साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये आर्मी मधील सेवा व वनरक्षक ते वनपाल आपल्या सेवेची महती दिली.
त्यांनी माँ जादंबा संस्थानचे श्री. हाजूसिंग चव्हाण नायक व श्री. विजय भाऊ राठोड यांचे विशेष आभर मानून माँ जगदंबा संस्थानचे सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
तसेच तिसरे सत्कार मूर्ती श्री.गोकुळ राठोड सर यांनी आपल्या मनोगतात माझी जन्मभूमी व कर्मभूमी हीच आहे माझे सर्व कुटुंब नाईक साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत जनता शिक्षण प्रसारक मंडळ येथे झालेल्या सेवेबद्दल त्यांनी उजाळा टाकला. आपल्या परिवाराची माहिती दिली.माँ जगदंबा संस्थान चे सर्व पदाधिकारी हे नेहमी तत्पर असतात,सर्व कामे एकत्र करून बंधू भावाने राहतात.
संस्थानामध्ये विविध उपयोगी वस्तू आणल्या आहे.श्री.हाजूसिंग चव्हाण नायक हे त्यांचे मोठे बंधू स्व.एन.सी. चव्हाण यांच्या वसा घेऊन समाजहिताचे कामे करत आहे.असे आपल्या मनोगतामध्ये विचार मांडले. अध्यक्षक्षीय भाषणात मा.श्री.बाजड सरांनी तिन्ही सत्कारमूर्ती चा पुन्हा सत्कार करून त्यांच्या कार्याच्या गुणगौरव केला. याप्रसंगी नवीन सभासदाचे स्वागतकरण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव नाईक विद्यालय पुसद येथील सहाय्यक शिक्षक श्री.महेश सुभाष चव्हाण सरांनी केले. तर आभार श्री. आत्माराम जाधव साहेब (ग्रामसेवक) यांनी मानले.
यावेळी रामू नाईक विद्यालय वरुड चे प्राचार्य श्री.डी.एफ. राठोड सर.कारभारी मेश्राम कडेल श्री.बंडुसिंग चव्हाण,श्री.सुरेश राठोड, श्री. पी. एम. चव्हाण, श्री आत्माराम जाधव,श्री.संजय चव्हाण (कोमल प्रोव्हीजन)श्री.रामधन राठोड, श्री. प्रकाश पवार श्री.पाईकराव सर, श्री.डोंगरे सर,स्नेह नगर येथील बिल्डर श्री. राजेश पिवळटकर साहेब,श्री.विनोद भाऊ राठोड(योगायोग),श्री.गोधाजी जमधाडे साहेब(माजी न.प. पाणी पुरवठा अधिकारी), श्री. बबनराव देशमुख श्री.ओंकार जाधव(पाटील),श्री भारत महिंद्रे,श्री.शेषराव राठोड सर,श्री.श्रीराम राठोड श्री.संजय चव्हाण (ब्रामणगांव) राजेश तुनगर,श्री रमेश भाऊ राठोड (उमरी)विनोद फुलमाळी,कैलास मांडोळे,उपस्थित होते. या कार्यमाच्या यशस्वी ते साठी माँ जगदंबा संस्थान येरावार ले आऊटचे ईटावा वॉर्डचे सर्व पदाधिकारी व नायक श्री. हाजूसिंग चव्हाण, श्री.विजय मेरसिंग राठोड.श्री.पंडित नंदू राठोड,श्री.महेश चव्हाण यांचे अथक परिश्रम लाभले.