

पुसद वार्ता :- गुलाब नबी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. संतोष जाधव
यांचे सुपुत्र डॉ. आशुतोष संतोष जाधवयांनी भारतातील फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम FMGE वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास झाल्याबाबत प्रा.संतोष जाधव यांचे सहकारी त्यांच्या घरी येऊन प्राध्यापक मंडळींनी वतीने त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आले.
मधुकर नाईक विद्यालयचे शिपाई रमेश चंद्रभान जाधव रा.काळी दौलत
ता .महागाव यांचे सुपुत्र डॉ. चेतन रमेश जाधव यांचा सत्कार वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक,लोकमतचे प्रतिनिधी, व्हॉइस ऑफ मीडियाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, तसेच दादासाहेब के. डी.
जाधव पतसंस्थेचे संचालक प्रा, शेषराव राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,तसेच पेढे भरून त्यांचा प्रथम श्रेणी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा त्यांना देण्यात आले.दोघांनी या यशाची श्रेय आई-वडील तसेच नातेवाईकांना देत आहे. एम.डी चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागात सेवा करण्याची इच्छा दोघांनी व्यक्त केली आहे.








