
पुसद:- रिपब्लिकन वार्ताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर झाकीर हुसेन सभागृह इक्बाल नगर पूर्णा जिल्हा परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन वार्ता समूहाचे विदर्भ विभाग उपसंचालक राजेश ढोले यांना राजकीय पत्रकार तसेच सामाजिक योगदानाबद्दल व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश मोदाने पूर्णा जिल्हा परभणी, प्रमुख अतिथी तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त धनराज गवळी, प्राध्यापक. श्रीकांत सोनवणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, अभिमान पवार समन्वयक रिपब्लिकन वार्ताचे प्रमुख, संपादक डॉ. अनिल आठवले सर, कार्यकारी संपादक सलीम सय्यद सर,व्यवस्थापक सुनील आठवले,रवींद्र कुमार गायकवाड, विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, आयोजक सलीम सय्यद सुहागनकर फुलंब्री, औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा, अनिल कलंके नाशिक, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे,एडिटर विभागाचे युवराज हुंगेकर केळापूर,यवतमाळ प्रतिनिधी हनुमान लसंते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.