Home » Uncategorized » ऊसतोड मजुराचा मुलगा पहिल्या प्रयत्नात एम. पी. एस. सी परीक्षेत उत्तीर्ण…

ऊसतोड मजुराचा मुलगा पहिल्या  प्रयत्नात  एम. पी. एस. सी परीक्षेत उत्तीर्ण…

Share:

सत्कारमूर्ती भागवत जाधव तसेच मार्गदर्शक शिक्षक


कनेरवाडी वार्ता:-
पुसद तालुक्यातील माळ पठारावरी वाघजाळी बंजारा तांड्यातील भागवत रंगराव जाधव यांनी एम. पी. एस. सी परीक्षेच्या माध्यमातून जूनियर क्लर्क ही परीक्षा प्राविण्यश्रेणी पास झाला आहे. भागवत पुसद येथे वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेचा विद्यार्थी आहे. भागवत पुसदला बारावी तसेच पुढील  शिक्षणाकरिता  तेव्हापासून पुसत येथे स्पर्धा परीक्षा तयारी करत होता. वडील, आई ऊसतोड मजूर असून ते कर्नाटक मध्ये कामासाठी  जात असतात तसेच भागवत हा लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे शिक्षणाच्या खर्चासाठी एक पैसा सुद्धा कमी आई-वडिलांनी पडू दिला नाही. त्यांची कष्ट,मेहनत ,आणि जिद्द.. स्वयं अध्ययन, कुठलीही कोचिंग क्लासला न जाता घरीच स्वयं अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात स्वतःच्या  जोरावर वाघजाळी येथील सुपुत्र एम.पी.एस.सी परीक्षेत तो नुकताच पास झाला आहे. आपल्या यशाची श्रेय आई-वडील तसेच युवक मंडळाचे सचिव विजय भाऊ जाधव ,प्राचार्य अनिल कुरमे,प्रा. नरेश राठोड, प्रा.शेषराव राठोड प्रा.रश्मी डेकाटे, शिव शंकर घरडे, राजेश बुरबुरे, सुबोध बहादुरे, कु. वंदना पोले,अभिजीत राठोड, संजय राठोड, अविनाश राठोड, बाळासाहेब कराळे, भूमेश्वर डोक, विजय राठोड,महेश चव्हाण,पांडुरंग जाधव, अमोल राठोड, युवराज जाधव,जांबुवत् राठोड , मांगीलाल चव्हाण, जवाहर चव्हाण, नीरज चव्हाण यांना देतो.

Leave a Comment