
पुसद :-तालुक्यातील माळपटारावरील कनेरवाडी येथे संत शिरोमणी, जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची 286 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर नाईक तसेच प्रमुख पाहुणे पोहरादेवी चे महंत नरेश महाराज,डॉ. रामचंद्र राठोड, प्रा. प्रेम राठोड, डॉ. अनिल राठोड यांच्या उपस्थिती होती.संत सेवालाल महाराज यांच्या पगडीची पालखी ला व मिरवणूकला सुरुवात झाली . डॉ. नाईक यांनी अध्यक्ष भाषणातून असे प्रतिपादन केले की संत सेवालाल महाराज संपूर्ण गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत, मानवतावादी, विज्ञानवादी, क्रांतिकारी संत होते. अडीचशे वर्षांपूर्वी त्यांनी भविष्यवाणी केली होती ती तंतोतंत खरी ठरत आहे.जसे रपिया कटोर पाणी विकल्या जाईल त्यांच्या सर्वच भविष्यवाणी खऱ्या ठरत आहे.पशुपक्षी जीवजंतू सगळ्याला देव प्रसन्न हो अशी महान त्यांची शिकवण होती. नंतर महाप्रसादाचा लाभ परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता नामदेव नाईक, वकिला कारभारी, सुनील राठोड, अशोक राठोड, चरण महाराज, शामराव राठोड भीमराव राठोड, नंदू राठोड, बालाजी बेले, रमेश मळगणे, केशव चव्हाण, रमेश राठोड, अनिल राठोड शकोराव राठोड, उल्हास राठोड, रणजीत चव्हाण,यांचे अथक परिश्रम लाभले परिश्रम लाभले.