Home » जीवनशैली » सामाजिक » जि. प. प्राथमीक शाळा मांडवा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी…

जि. प. प्राथमीक शाळा मांडवा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी…

Share:

शाळेतील शिक्षिका तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी

मांडवा:- पुसद तालुक्यातील मांडवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती. विश्रांती मस्के होत्या. प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच  शिक्षण प्रेमी विठ्ठल नथू राठोड होते. गावातील अनेक मान्यवरांच्या उपस्थित संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. वैशाली बोंबीलवार मॅडम यांनी केला. सोनाली ढोले, ऋतुजा विठ्ठल राठोड, ज्योती या विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर विचार मांडले. तसेच गावातील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण  प्रेमी विठ्ठल नथू राठोड यांनी विद्यार्थ्यांना संत सेवालाल महाराज विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती. विश्रांती मस्के मॅडम आणि श्रीमती. राखी जयस्वाल मॅडम यांनी सुद्धा संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर विचार प्रकट केले. शाळेमध्ये बंजारा संस्कृती वेशभूषा घालून विद्यार्थिनी शाळेत आल्या होत्या.

Leave a Comment