
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
वाढदिवस विशेष
प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत मा. एकनाथ गोफणे सरांचा आज 46 व्या वाढदिवस निमित्त याडी परिवारातर्फे मनभर शुभेच्छा!
एकनाथ गोपने सर म्हणजे केवळ गोर साहित्यातीलच नाही तर मराठी साहित्यातील कोहिनूर आहे. आपली शिक्षकाची नोकरी सांभाळून तेच साहित्य क्षेत्रामध्ये सतत कार्यरत राहतात त्यांच्या जन्म १९ फेब्रुवारी १९७९ रोजी झाला असून त्यांचे शिक्षण MEd.B.Ed नाट्यशास्त्र या विषयांमध्ये झालेले असून सध्या ते महाराष्ट्रातील विविध शासकीय, खाजगी, मासिक साप्ताहिक, दैनिका मधून विविधांगी लेखन करत असतात. त्यांचे लेखन हे हृदयाला भिडणारे असून त्यांच्या कविता ह्या मनाला वेड लावणाऱ्या आहेत.
एक प्रतिभावंत साहित्यिक तथा प्रसिद्ध कवी म्हणून त्यांची सर्व दूर ओळख आहे. एवढेच नव्हे तर आधुनिक लोकनाट्य या पुस्तकात ‘वगनाट्य’ प्रकाशित झालेले आहे. ‘माझी कथा माझी बोली’ व ‘कथाबोली’ या पुस्तकात बंजारा बोलीतील कथा सुद्धा प्रकाशित झालेल्या आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, हैदराबाद, गुजरात या भागातील साहित्यिक व सामाजिक नाटकाच्या निमित्ताने कार्यक्रमात ते नेहमी हिरारीने भाग घेत असतात. सन २००९ साली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने त्यांना नाटकातील भूमिकेसाठी पुरुष गटाचा अभिनय पारितोषक बहाल करण्यात आले होते. गोफणे सरांना नाटकातील कोणतीही भूमिका मिळो ते त्यामध्ये जीव ओततात आणि त्या भूमिकेला ते नेहमी न्याय देत असतात. त्यामुळे त्यांच्या नाटकातील भूमिका कायम स्मरणात राहतात. आकाशवाणीसाठी त्यांनी विविध विषयावर लेखन केले असून सतत पाच वर्ष सादरीकरण सुद्धा केलेली आहे. बंजारा समाजासह आकाशवाणीवर विविध विषयावर त्यांची मांडणी अप्रतिम होती. सध्या गोफणे सर खानदेशी रेडू आणि गोरबोली रेडिओ माध्यमातून अहिराणी, बंजारा आणि मराठी भाषेचे विविध कार्यक्रम सादरीकरण व प्रसारण करतात. त्यामुळे अहिराणी, बंजारा आणि मराठी साहित्य हे सातासमुद्रापार गेल्याचे सर्व श्रेय गोफणे सरांना जाते.
दैनिक देशदूत जळगाव आवृत्ती मध्ये ‘चावडी’ नावाची प्रबोधन लेख मालिका ‘आप्पा मारतोय गप्पा’ हे सदर लेखन प्रकाशित करण्यात आले होते. ते प्रचंड गाजले आहे. सध्या दैनिक लोकशाही या लोकप्रिय वृत्तपत्रातून अहिराणी व मराठी भाषेतून ‘बस स्टॉप वरील गप्पा’ आणि अनेक गोर बंजारा साहित्य ग्रंथांची अप्रतिम समीक्षा व विविधांगी लेखन सदर प्रकाशित करण्यात येत आहे. सोबतच विविध पुस्तकाच्या परिचयात्मक लेखनाची शब्द मालिका सुरू आहे. एवढेच नव्हे तर साहित्य लेखन विषयक मार्गदर्शन सुद्धा ते करत असतात.
विविध साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद ,कथाकथन, काव्य वाचन संमेलनामध्ये ते हिरारीने भाग घेत असून २०१७ पासून स्वच्छंदी भरारी या दिवाळी अंकाचे संपादन केलेले असून या अंकाच्या माध्यमातून बंजारा भाषेचा महाराष्ट्रातील विविध बोली भाषांचा जतन आणि संवर्धनाचे कार्य ते नेटाने पार पाडत आहे. एवढेच नव्हे तर स्वतंत्र वेबसाईटच्या माध्यमातून गोरबोली रेडिओ आणि गोरबोली एफ. एम. या वेब रेडिओ ची निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली असून जगभरातील एकोणवीस देशांमध्ये बंजारा रेडिओचे कार्यक्रम आज रोजी ऐकले जातात. बंजारा बोली भाषेच्या मौखिक साहित्यासह लिखित साहित्याला जतन, संवर्धन करण्यास प्रेरणा देण्यासाठी गोरबोली रेडिओचे कार्य सुरू असून बंजारा समाजातील विविध कवी, लेखक ,कलावंत यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम सुद्धा या रेडिओवर सुरू असतात. आणि ॲमेझॉन या जागतिक साइटवर ‘स्वच्छंदी भरारी’ या दिवाळी अंकाची विक्री होत आहे.
गोर साहित्यच नव्हे तर मराठी साहित्यामध्ये एक प्रतिभावंत साहित्यिक तथा कवी म्हणून एकनाथजी गोफणे सरांचा धबधबा असून केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची सर्वदूर ओळख आहे.
अशा महान साहित्यिकास याडी परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या साहित्य क्षेत्राची भरभराटी होवो अशी सेवाबापू चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद!!
✍️ याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद-९४२१७७४३७२