Home » जीवनशैली » सामाजिक » पुसद येथे ग्रामसेवक पतसंस्थेच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ

पुसद येथे ग्रामसेवक पतसंस्थेच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ

Share:

धनादेश देताना ग्रामसेवक सहकारी पत संस्था पदाधिकारी

ग्रामसेवक पतसंस्थेचा स्तुत्यपूर्ण उपक्रम

पुसद प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हा ग्रामसेवक सह. पतसंस्था र नं १३७ तर्फे
चालू आर्थिक वर्षात घोषित करण्यात आलेल्या “लेक लाडकी”योजनेचा दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी पुसद येथे शुभारंभ करण्यात आला.

योजनेअंतर्गत संस्थेच्या नियमित सभासदाच्या एका
मुलीला तिच्या विवाहप्रसंगी पतसंस्थेकडून रु ५१०००/-रु ची राशी धनादेश स्वरूपात भेट म्हणून देण्यात येते.पुसद पं स येथे कार्यरत ग्रा. पं. अधिकारी बाळासाहेब कबले यांच्या कन्येला तिच्या विवाह प्रसंगी सदर योजनेअंतर्गत पहिला धनादेश प्रदान करण्यात आला.याप्रसंगी सदर अभिनव योजनेमुळे पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच पतसंस्थेच्या संचालक मंडळाकडून गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या सभासद हितांच्या विविध योजनांमुळे ग्रामसेवक पतसंस्थेच्या पदाधिकारी यांचे कौतुक करण्यात येत आहे..

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गावंडे, उपाध्यक्ष सत्यपाल घाटे, सचिव संतोष तडसे, कोषाध्यक्ष अमोल भांडवलकर, संचालक निलेश वैद्य, प्रेमसिंग चव्हाण, व्यवस्थापक इंगोले,पुसद पं स चे गटविकास अधिकारी संजय राठोड, ग्रा पं अधिकारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम राठोड, तालुकाध्यक्ष संजय हिंगाडे , पुसद पं स येथील दिनेश खेकाळे अश्विन तांबडे, विजय घावस ,बी .बी .इंगळे ,सि.टी .पंडितकर, अविनाश चव्हाण (मामा), ए. बी .जाधव ,दुर्गादास राठोड , गंगावणे साहेब ,विलास टारफे , पंडित भिसे , योगेश दुधे , संतोष डाखोरे, शंकर खंदारे, बापूराव तांबारे, गुळवे साहेब विकी बरोडकर, सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave a Comment