Home » शैक्षणिक » सामाजिक » बेलोरा येथे ‘जागतिक महिलादिन’ उत्साहात साजरा..

बेलोरा येथे ‘जागतिक महिलादिन’ उत्साहात साजरा..

Share:

महिला भगिनी
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 


पुसद: तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात घेन्यात आला.दि .८ मार्च २०२५ शनिवारी सकाळी ठीक ९ .०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या कर्तव्यदक्ष महिला अध्यापिका कु.सारजा वाढोणकर मॅडम होत्या . प्रमुख पाहुण्या अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले बचत गट,कर्तृत्ववान महिला. यावेळी कार्यक्रमास आर्वजून उपस्थित होत्या.यावेळी सर्वांनी मिळून निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली.त्यात अंजली घोलप,बेबीताताई चव्हान, वैशालीताई धनवे,लताताई धायगुडे,अफसाना सय्यद,वैशालीताई पोले,बेबीताई परुळे,नंदाताई झुंझारे,मंगलाताई डोंगरे,सविताताई झुंजारे, इंदुताई पेंढारकर, प्रमिलाताई धनवे,शितलताई जामकर, नंदाताई कांबळे,अनुसया बरहाळे,नम्रता चव्हान,चंदाताई चव्हान, विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के, दिलीप चव्हान,इत्यादी मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते.यावेळी क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले यांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांनी पुष्पमाला व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आजच्या जागतिक महिला दिनाचे महत्व विद्यालयाचे प्राचार्य आदरनिय श्री पंडितराव मस्के सरांनी सांगीतले .या वेळी ते म्हणाले की प्रत्येक महिला ही महान आहे.आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्याचे काम प्रत्येक माता ही खंबीरपणे करत असते. म्हणजेच आपली माता हीच आपला आदर्श गुरू आहे.ज्यांच्या जवळ आई आहे तो सर्वात सुखी व्यक्ती होय, आणि ज्यांच्या जवळ आई नाही तो सर्वात दुःखी व्यक्ती होय.म्हणूनच म्हणतात की “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.” असे त्यांनी विविध सत्य उदाहरणे देऊन संगितले. त्यानंतर कु. वैष्णवी गडदे, कू.अक्षरा चव्हान, कू.अमृता घोलप,कू. कोमल चव्हान, इत्यादि मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले.व सर्वांना शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमास उपस्थित महिलाचा साडीचोळी, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन यथोचीत सत्कार करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाचे रूपांतर माता पालक सभेत करून प्राचार्य श्री पंडितराव मस्के सरांनी ,मातेची विद्यार्था प्रतिभूमिका काय असावी . या विषयावर विस्तृत प्रमानात माहीती दिली.कार्यकमाची सागंता, तू नाहीस अबला.या गीताने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. योगेश आडे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.दत्तराव काळबांडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment