


पुसद :-तालुक्याला हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा वारसा लाभलेला आहे.ह्या लोकांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात अनेक कामे केले. त्यांच्या प्रभावाने पुसद तालुका नावलौकी कास आला. त्यानंतर मात्र पुसद तालुक्यात कामे अपूर्ण असल्याचे चित्र दिसून येते.

रस्त्याचे कामे नसल्याने रस्ते जागोजागी फुटले आहेत. वाहने तर सोडा पण माणसांना जाण्या येण्याची अडचण होते. बरेच अपघात रात्री अपरात्री होतात. दिवसाही खडे चुकवितांना अपघाताची मालिका वाढली आहे. निधी उपलब्ध असताना ही कामे अपूर्ण कशी आहेत असा सवाल जनता विचारू लागली आहे. खडी उखरलेली, रस्त्यांच्या मधोमध खड्डे असल्याने बरेच लोक अपघात होऊन मृत्युमुखी पडले आहे. अशाचप्रकारे पाणीपुरवठा विभागाने कामाची दुर्दशा करून ठेवली आहे. हिवाळ्यात सुद्धा पाण्याची योग्य सोय नसल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती होती आता उन्हाळ्यात तर फारच वेदनादायी परिस्थिती. माय डोक्यावर घागर व कडेवर बाळ घेऊन कित्येक मेल जाते परंतु तेथील आमदाराला किव येत नाही. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या पडक्या झाल्या आहेत. त्यांची डाग डुजी होत नाही. काही ठिकाणी पाण्याचा टाक्या अपूर्ण आहेत.

मुख्यमंत्री नाईक घराण्याचा वारसा केवळ नावालाच उरला आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने अनेक कुटुंब वाऱ्यावर आहेत. ज्यांच्याकडे वाहने आहेत, विहिरी आहेत त्याच लोकांना पाणी मिळते. वंचित लोकांना आधुनिक भारतात सुद्धा पाहण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. अशा पद्धतीने पुसद तालुक्यात कामाच्या बाबतीत हा तालुका चाळीस वर्षे मागे गेल्याचे जनता कुजबुजत आहे.
आमदार या गोष्टीकडे लक्ष देतील का? हे नावाला जनता दरबार घेतील असा सवाल जनता करीत आहे. आमदारांचा जनता दरबार मॅनेज असल्याचेही बोलले जाते. जग कुठे चालले परंतु पुसद तालुक्यात पायाभूत सुविधा सुद्धा होत नाही. पुसद तालुक्याच्या ह्या समस्या कधी मिटतील याची जनता वाट पाहत आहे.








