Home » जीवनशैली » सामाजिक » बेलोरा येथे निरोप व स्वागत समारंभ संपन्न…

बेलोरा येथे निरोप व स्वागत समारंभ संपन्न…

Share:

शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी


पुसद :-श्री शिवाजी माध्य . व उच्च माध्य .विद्यालय बेलोरा .आज दि .४ / ४ / २०२५ला शुक्रवारी ठिक १० वाजता विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक आयुष्यमान श्री सखारामजी धबाले यांचे स्थलांतर श्री शिवाजी विद्यालय पोफाळी येथे झाले असून त्यांचा आज निरोप समारंभ कार्यक्रम घेन्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पंडितराव मस्के सरांनी पुष्पगुच्छ , शाल , श्रीफळ देऊन , त्यांच्या प्रदिर्घ कार्याचा गुणगौरव केला.तसेच आदरनिय श्री गणेशराव जाधव यांची वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा पन पुष्पगुच्छ , शाल , श्रीफळ देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .या प्रसंगी सहकारी अध्यापक वर्गानी आठवनी जागृत करून त्यांच्या प्रति स्नेहभाव व्यक्त केला .कार्यक्रमास सर्व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रमुख पाहुणे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री जीवने सर, प्रा.वाघमारे सर, प्रा.आडे सर, श्री काळबांडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सत्काराला भावपूर्ण उत्तर श्री धबाले बाबू यांनी दिले.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री मुकाडे सर यांनी केले.तर आभाप्रदर्शन संजय आसोले यांनी केले.

Leave a Comment