
पोहरागड :- मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे पवित्र स्थान पोहरागड या ठिकाणी दरवर्षी श्रीराम नवमीला यात्रा भरत असते. लाखो भक्त संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण भारतातून येत असतात. मोदी सरकारने आणि शिवसेनेचे आमदार संजय भाऊ राठोड यांनी बंजारा समाजाचे भूषण असलेले स्थान पोहरागड ला सुशोभित करण्याचा काम केले आहे.

बंजारा समाजाचे संत स्वर्गीय धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांनी सन २०१८ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन” एक राष्ट्र, एक प्रवर्ग, एक आरक्षण” ही मागणी केली होती. बंजारा समाज हा भारतभर मोठ्या प्रमाणात विखुरलेला असून समाजाच्या एकसंथ आरक्षणाच्या मागणीला आता अधिक जोर धरत आहे. त्यावेळी स्वर्गीय धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांना सकारात्मक आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बंजारा समाजाचे नवे धर्मगुरू डॉक्टर बाबुसिंग महाराज (विधान परिषद आमदार ) यांनी सुद्धा “एक राष्ट्र, एक प्रवर्ग,एक आरक्षण “ची मागणीची सातत्याने पाठपुरावा करत आहे.
आजचा दिवस बंजारा समाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे कारण बंजारा समाजाच्या काशी समजल्या जाणाऱ्या पवित्र पोहरादेवी क्षेत्रामध्ये प्रथम शासकीय पूजा होत आहे. महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या पत्नी अमृता ताई यांच्या हस्ते पूजा होत आहे. हे बंजारा समाजासाठी अभिमानास्पद आणि आत्मसन्मानाचा आणि सामाजिक ओळखीचा नवा अध्याय आहे. असे बंजारा समाजात भावना व्यक्त केली जात आहे.