

पुसद
धमक्रांती प्रज्ञापर्व, आयोजित धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने काल दिनांक 9 एप्रिल रोजी दुसऱ्या सत्रामध्ये
सीमाताई पाटील व जॉली मोरे मुंबई यांच्या
भारतीय संविधानाची गौरव गाथा
आंबेडकरी जलशाचे
यशवंत रंगमंदिर येथे सादरीकरण करण्यात आले. तसेच आयोजित केलेल्या प्रज्ञा पर्व समितीच्या तीसऱ्या सत्रामध्ये उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला विनम्र अभिवादन करण्यात आले.



*धम्मचक्र महिला मंडळ आदर्श नगर, व महिला मंडळ सुदर्शन नगर
यांच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मोहिनी ताई नाईक म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात जन्मदिन जयंती साजरी केल्या जाते, संपूर्ण वंचित दलित समाजासहित महिला नारीला न्याय व सक्षम करण्याचे काम कोणी केले असेल तर ते म्हणजे
जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण धम्म बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
एक निळा अन एक भगवा, दाही दिशेला लावी दिवा,! एक वाघाचा आणि एक सिंहाचा छावा.!! जिजाईचा तो शिवा अन.. भीमाईचा तो भिवा…!!! अशा अनेक परिवर्तनवादी पहाडी आवाजाच्या गीतातून सीमाताई पाटील महिला शाहीर व जॉली मोरे मुंबई यांच्या आंबेडकरी जलशाने यशवंत रंगमंदिर येथील खचाखच भरलेल्या उपस्थित धम्म बांधवासहित उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. विविध सामाजिक परिवर्तनवादी
शाहिरी आवाजाने विविध पैलू उलगडणारी ऐतिहासिक गीते सादर केली…
कार्यक्रमाच्या शेवटी निसर्गरुपी वातावरण बदलल्याने पाऊस येण्याचे वातावरण निर्माण झाले होते परंतु धम्म बांधव उपासक उपाशिका मात्र जागेवरच बसून होते
त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने सर्वांना एकत्र बांधून ठेवले होते…
यावेळी मंचावर महिलांची प्रमुख उपस्थिती होती, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष , मोहिनी ताई इंद्रनील नाईक, होत्या प्रमुख उपस्थिती मीनाक्षीताई गोटे, मायाताई ठोके, सीमा तायडे, शितल राजेश ढगे डॉ. प्रियंका गायकवाड, खाडे, अनिता कांबळे अश्विनी पुनवटकर, वर्षाताई भवरे,अर्चना भुरके डॉ. प्रज्ञा जाधव, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई येथील महिला शाहीर जलसा पाहण्यासाठी
महिला, बालक, युवक धम्मबांधव यांच्या उपस्थितीने यशवंत रंगमंदिराचे मैदान खचाखच भरले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती शशांक भरणे, तर आभार उषा राजेश ढोले यांनी केले.