
पुसद ईटावा वार्ता: हिंदू धर्मात हनुमान चालिसाचे महत्त्व खूप आहे. हनुमान चालिसाचा पाठ केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो. ज्या व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो, त्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने ती दूर होते. प्रभू रामाच निस्सीम भक्त बजरंगबली आजही कलियुगात कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रवास करत आहे. त्यांना कलियुगाचा देव देखील म्हणतात. असे मानले जाते की हनुमानजींना अमरत्वाचे वरदान आहे. असेच श्री. हनुमान मंदिर रेवती ले-आऊट नवीन बांधकाम पाण्याच्या टॉकीजवळ ईटावा वॉर्ड पुसद येथे श्री. आनंदभाऊ शिरमवार व परिसरातील नागरिकांनी बांधले आहे. या मंदिरात दररोज असंख्य भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. या मंदिराचे रंगकाम नुकतेच श्री. आनंद भाऊ शिरमवार यांनी केले आहे तसेच श्री.आनंद भाऊ यांचे कट्टर मित्र श्री.आशिष भाऊ सावंगेकर (पटवारी) सुभाष वॉर्ड पुसद व श्री. विजयभाऊ तुनगर (सोनार ) पुसद यांच्या तर्फे श्री. संकट मोचन मंदिरास ऍम्प्लिफायर व स्पीकर भेट देण्यात आले. या मंदिराला परिसरातील नागरिक वेळोवेळी सहकार्य करत असतात. या मंदिराचे देखरेख श्री.आनंद भाऊ शिरमवार,परिसरातील नायक श्री.हाजूसिंग चव्हाण, श्री श्यामसुंदर शर्मा(पुजारी) श्री. सुरेश राठोड, श्रीआशिष शिरमवार श्री.महेश चव्हाण, श्री. पंडित राठोड व परिसरातील नागरिक करत असतात. या 12 तारीखेला होणाऱ्या हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तरी सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा.!








