Home » Uncategorized » वाघामय देवी आदिवासी माध्यमिक शाळेतील गायत्रीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गगन भरारी!

वाघामय देवी आदिवासी माध्यमिक शाळेतील गायत्रीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गगन भरारी!

Share:

राजना प्रतिनिधी :-

 रुई (गोस्ता )येथील वाघामाय देवी आदिवासी शाळेची इयत्ता ८वी ची विद्यार्थिनी कु. गायत्री नरेश पवार हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य पातळीवर यश संपादन केले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली असून तिला रोख  रक्कम आणि शिष्यवृत्ती प्रमाणपत्र मिळणार आहे. गायत्री नरेश पवार हिचे वडील शेतकरी असून गायत्रीने स्वतःच्या जीवावर मेहनत करून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यश संपादन केले. गायत्रीला विचारलं असता तिने असे सांगितले की, जर स्वतःवर विश्वास मेहनत करण्याची तयारी असेल तर घराची कितीही गरीबी असल्यावरही यश संपादन करता येते, असा अनमोल विचार तिने सांगितले. तिच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गायत्रीचे  कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *