वसंतराव नाईक विद्यालय पुसद येथे वारली चित्रकला शिबिर दिनांक 05 /05/ 2025 ते0 9 /05 /2025 पर्यंत घेण्यात येत आहे आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी नवनवीन कलेपासून वंचित झालेला दिसतो त्यांच्या अंगी उपजात असलेल्या कलागुणांचा विकास झालेला दिसत नाही. शालेय जीवनात शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबर ज्ञान मनोरंजन विविध कला कलात्मक शिबिर व्हावे व सहज सुलभ दर्शन व्हावे त्यांच्या अंगी असलेली क्रियाशीलता वाढावी म्हणून वरील उदांत पूर्ण हेतूने नाविन्यपूर्ण वारली चित्रकला संस्कार शिबिराचे प्रथमच पुसद मधील सर्व शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यामध्ये वर्ग 5वी ते 10वी पर्यंत मुलांन करिता आहे पालक वर्गास नम्र विनंती की आयोजित शिबिरामध्ये आपल्या पाल्यांना सहभागी करून संधीचा लाभ द्यावा शिबिराचे स्थळ वसंतराव नाईक विद्यालय पुसद शिबिराची वेळ सकाळी 7-30 ते 9-00 पर्यंत राहील सर्व विद्यार्थ्यांनी या वारली चित्रकला शिबिरामध्ये उपस्थित राहून नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुक्त आनंद घ्यावे असे आदरणीय मुख्याध्यापक अनिल कुरमे सरांनी मुलांना सूचना दिली व माननीय सचिव साहेब विजय भाऊ जाधव युवक मंडळ पुसद यांनी सुद्धा शिबिरासाठी परवानगी दिली आहे आदरणीय पूजाताई जाधव यांनी या नवीन उपक्रमाविषयी कौतुक केले आहे. आपल्या पुसद शहरामध्ये असे वारली चित्रकला शिबिर पहिलीच वेळ पहात आहे असे देव भाऊ जाधव यांनी शिबीर संयोजक विजय जीवा राठोड कलाशिक्षक यांचे अभिनंदन करत शाळेतील सर्व शिक्षकांना इतर कोणत्याही वस्तूची गरज भासल्यास तर ती आम्ही पूर्ण करू असे सांगितले आहे.
नाव नोंदणी दिनांक 01/05/2025पासून सुरू आहे.
वेळ सकाळी 08 ते संद्याकाळी 11 पर्यंत
नाव नोंदणी श्री.महेश चव्हाण व श्री.व्ही.जे.राठोड सर यांच्या वॉट्सअप करू शकता.
9421935293
9011271733
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र दिले जातील.
