कान्हेरवाडी वार्ता:-
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत सेवालाल महाराज, जगदंबा माता यांच्या यात्रा निमित्त भव्य मिरवणूक व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्ताने घेतला यावेळी वाघजाळी, बेलोरा, मांजर जवळा, आणि असोला भाविक भक्त यांनी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला मोहिनीताई नाईक, पोहरादेवीचे महंत नरेश महाराज, बी. जी राठोड, श्रीकांत राठोड राठोड, जामुवंत राठोड, धोंडबाराव पोले, विलास चव्हाण यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी नामदेव नाईक, वकील कारभारी, सुनील राठोड, बालाजी बेले, पारेश्वर दळवे,अशोक राठोड, डॉ. सौरभ राठोड,चरण महाराज, मोहन राठोड, भीमराव राठोड, शामराव राठोड, वसंता राठोड, केशव चव्हाण, नंदू राठोड, अनिल राठोड, रमेश राठोड, फकिरा पवार, विष्णू शिरडे, संभाजी शेळके, राजु राठोड, अरविंद चव्हाण, सुरेश राठोड, बाबुसिंग राठोड यांचे अथक परिश्रम लाभले.
