
पुसद : तालुक्यातील श्री शिवाजी माध्यमिक विध्यालयाने मार्च २०२५ ला अमरावती विभागीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या १० वीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.या परीक्षेला विद्यालयातून १०४ विदयार्थी बसले होते. त्यापैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले,तर ०७ विदयार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णां पैकी प्रथम क्रमांक गणेश किरण सोडगिर या मुलाने मिठविला आहे. त्याने ९१.६०% गुण मिळविले आहेत, तर द्वितीय’ क्रमांक वैभव संतोष राठोड या मुलाने मिळविला आहे, त्याला ८५. ८०% गुण मिळाले आहेत. तृतीय क्रमांक कः मयुरी पांडुरंग मुदनर या मुलीने मिळविला आहे. तीला ८५.६०% गुण मिळाले आहेत,४ था क्रमांक कु.तनवी केशवराव मारकड या मुलीने मिळविला आहे तिला ८५% गुण मिळाले आहेत.विदयालयाचा निकाल ९३.२६% लागला आहे. तर इतर मुलांनाही चांगले गुण मिळाले आहेत. ग्रामीण भागातील मुले सुध्दा चांगले गुण मिळवु शकतात हे या मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष मा.अनिरुद्ध पाटील चोंढीकर साहेब तसेच संस्थेच्या सचिव सौ.आश्विनीताई पाटील चोंढीकर यांनी भरभरून अभिनंदन केले आहे. तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के,प्रा. दत्तरावजी जीवने प्रा.शालिक वाघमारे, प्रा. योगेश आडे, प्रा.दत्तराव काळबांडे प्रा.भास्कर मुकाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.