Home » Uncategorized » गौळ( खुर्द )बस स्थानक परिसरात अवैध देशी विदेशी दारुची सरास विक्री…

गौळ( खुर्द )बस स्थानक परिसरात अवैध देशी विदेशी दारुची सरास विक्री…

Share:

देशी विदेशी दारू

गौळ( खुर्द ): येथे बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध देशी, विदेशी दारू विक्रीच्या अंड्यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गावात वाटेल तेव्हा, वाटेल तेवढी दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी दारूच्या आहारी जात आहे. परिणामी गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत  चालले असून नको त्या भानगडी उद्भवत आहेत.

   अनेकाचे संसार उध्वस्त झाले आणि होत आहेत. मागील आठवड्यात एका मध्यधुंद युवकांनी आपली मोटरसायकल रस्त्यावर उभ्या दोन तरुणांच्या सरळ अंगावर घातल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सदर प्रकरण पोलीस स्टेशन पोफळी येथे दहा-बारा जनावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय परिसरात चोरीच्या घटना देखील घडत आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या अवैध धंद्याला लगाम लावण्याचे काम स्थानिक पोलीस प्रशासन करीत असल्यामुळे तेथील सामाजिक सलोखा धोक्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *