Home » राजकारण » मधुकरनगर येथे दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न

मधुकरनगर येथे दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न

Share:

भारतीय बौद्ध महासभा

पुसद प्रतिनिधी
दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ व तालुका शाखा पुसद यांच्या अंतर्गत मधुकरनगर येथील तक्षशिला बुध्दविहारात दहा दिवशीय उपासक उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.१० मे ते १९ मे पर्यंत करण्यात आले होते.

तालुका शाखा पुसद यांच्यावतीने आतापर्यंत ६२ गावामध्ये दहा दिवशीय उपासक उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. तर ६३ व्या दहा दिवशीय धम्मप्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सीमा डोंगरे , तर प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, तुकाराम चवरे, प्रल्हाद खडसे, प्रभाकर पाईकराव व विजय बहादुरे मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका प्रमिलाताई डांगे, महिला तालुकाध्यक्ष रंजनाताई वाढवे, रमाबाई केवटे हे मान्यवर उपस्थित होते.
या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सिमाताई डोंगरे, प्रतीक्षाताई झोडगे,जिजाबाई डोंगरे या शिबिरार्थीने आपली मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम चवरे यांनी केले तर आभार प्रतीक्षाताई झोडगे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *