कनेरवाडी वार्ता

अलीकडे शहर विभागात लग्न म्हणजे इव्हेंट. डीजे, संगीत, नृत्य, फटाक्यांची आतषबाजी आणि खाद्यपदार्थांचा चमचमीत मेनू, परंतु, गाव खेड्यात अजूनही ग्राम संस्कृती जीवंत आहे. त्याची चुणूक गुरुवारी कन्हेरवाडीत दिसून आली.
वृक्ष चळवळीत पुढाकार घेणाऱ्या पर्यावरणप्रेमी नवरदेवाने ‘आधी वृक्षारोपण, नंतरच लग्न बंधन’ या वचनाची पूरर्ती करीत समाजासमोर
विवाहापूर्वी वृक्षारोपण करताना वर-वधुसह त्यांचे नातेवाईक,नवीन आदर्श ठेवला.
माळ पठारवरील कन्हेरवाडी हे बंजाराबहुल गाव. एप्रिल-मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात डोक्यावर कापडी
मंडप व अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा. डीजेवर नवरदेवाकडील तरुणांची बेधुंद नाचणारी फौज. त्यामुळे लग्न लागण्यास किमान दोन तीन तासांचा
उशीर हा ठरलेला. मात्र, या गोष्टींना फाटा देत कन्हेरवाडी येथील लग्नात पर्यावरण रक्षणाची तुतारी निनादली. उमरखेड तालुक्यातील बेलखेड येथील
आकाश रोहिदास जाधव यांचा वधू मंडपी पुष्पा विष्णू राठोड यांच्याशी विवाह अनोख्या पद्धतीने पार पडला.
लग्नात डीजे नव्हता. तरुणाईचा बेधुंद ताफा नव्हता. उलट, लग्नमंडपात शिरण्यापूर्वी वृक्षारोपण करण्याचा आग्रह नवरदेव आकाशने घरला. वधू पिता विष्णू राठोड स्वतः शेतकरी आहेत. त्यांना हा विचार पटला. त्यांच्या शेतातच उभारलेल्या मंडप परिसरात वृक्षारोपणाची तयारी झाली. आकाश व पुष्पा या होऊ घातलेल्या नव दाम्पत्याने कडुलिंबाचे रोपटे मातीत लावले. वधूपिता विष्णू राठोड यांनी रोपट्याला पाणी घातले. त्या
सरशी वहऱ्हाडी मंडळींनी टाळ्यांचा एकच गजर केला.
नवरदेव आकाश हा नागपूर येथील दिव्यांग विभागात शिक्षक आहे. त्याला सुरवातीपासूनच वृक्ष संगोपनाची आवड आहे. पर्यावरणाचा लळा आहे. वाढते वैश्विक तापमान आणि त्यात होरपळून निघणारी सृष्टी या गोष्टींनी व्यथित होऊन ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ या धर्तीवर ‘आधी वृक्षारोपण आणि नंतर लग्न गाठ’ असे आकाशने मनोमन ठरवले होते. हा विचार प्रत्यक्षात आणून आकाश व पुष्या या नव दाम्पत्याने नवा आदर्श यावेळी पोहरादेवी चे महत्व नरेश महाराज,सरपंच रूपालीताई पोले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तराव राठोड, सामाजिक कार्यकर्ते, कृष्णा जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष सत्तू शेठ अनसिंग, बालाजी बेल, अशोक राठोड,, डॉ. सौरव राठोड, विलास चव्हाण, लक्ष्मण राठोड, विष्णू शिरडे, गोपाळ आसोले, सुनील राठोड, भीमराव राठोड, शंकर बोडके, राजू सिंग राठोड, प्रकाश जवादे यांचे पथक परिश्रम लाभली








