
पुसद .तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला .यावेळी योगशिक्षक भास्कर मुकाडे यांनी नियमित योगासने केल्यामुळे आपले शरीर बळकट बनते ,आपण निरोगी राहतो ,कोणताही रोग आपणास होत नाही .शांत झोप लागते .चांगली भूक लागते .आपल्या शरीराच्या सर्व नैसर्गिक क्रिया व्यवस्थित होतात .मन प्रसन्न राहते ,कोणतेही काम करण्यासाठी उत्साह वाटतो .सकारात्मक भावना वाढते असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन व स्वतः विविध योगासने करून दाखविले .यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी योगासने केली. व निरोगी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. योग गुरु माननीय रामदेव बाबा यांनी सांगितलेल्या नियमानुसार वागण्याचे ठरविले.( करे योग ,रहे निरोग )या मंत्रानुसार व्यायाम करण्याचा सामूहिक निश्चय करून योग गुरु यांचे आभार मानण्यात आले या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के ,प्रा.दतराव जीवने ,प्रा.शालिक वाघमारे ,प्रा.दतराव काळबांडे ,प्रा. योगेश आडे ,कु.सारजा वाढोनकर, संजय असोले ,विजय वंजारे ,विठ्ठल ढाले,भीमराव मनवर, संभाजी जाधव .शंकराव आसोले,गजानन नरोटे ,गणेश जाधव ,जीवन राठोड ,विठ्ठल पोले ,पांडुरंग मारकड,विष्णू नप्ते, रमेश तडसे, भाऊराव माघाडे,वैभव जाधव ,वेदांत मारकड, रविकिरण काष्टेसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते .शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








