
पुसद :-तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के सर यांनी स्वीकारले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शालिक वाघमारे ,पा.दत्तराव जीवने,विचारपीठावर उपस्थित होते .सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले .जेष्ठ शिक्षक भास्कर मुकाडे यांनी विचार व्यक्त करतांना सांगितले, की राजर्षी शाहू महाराज हे मोठ्या दिलाचा राजा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या राज्यामध्ये गाव तेथे शाळा .ही मोहीम चांगल्या प्रकारे राबविली.या मागचा त्यांचा हेतू असा होता की आपल्या येथील कोणताही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये ,जो रोज शाळेत येईल त्याला एक रुपया बक्षीस देण्यात येईल व जो शाळेत येणार नाही त्याच्याकडून एक रुपया दंड वसूल करण्यात येईल. असे त्यांनी जाहीर केले होते. यावेळी प्रा .शालिक वाघमारे व प्रा. दतराव जीवने यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के सर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की ,शाहू महाराज हे लोक कल्याणकारी राजे होते, त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय असोले यांनी केले तर आभार प्रदर्शन भीमराव मनवर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दतराव काळबांडे,प्रा .योगेश आडे, कु.सारजा वाढोनकर ,विजय वंजारे ,गजानन नरोटे ,विठ्ठल ढाले ,रमेश तडसे, संभाजी जाधव ,शंकरराव आसोले ,गणेश जाधव, जीवन राठोड, वेदांत मारकड, विष्णू नप्ते, वैभव जाधव ,इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.








