Home » शैक्षणिक » सामाजिक » मांडवा येथे करियर आणि कायदा विशेष संवाद कार्यक्रम

मांडवा येथे करियर आणि कायदा विशेष संवाद कार्यक्रम

Share:

हर्षवर्धन बीजे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच समस्त गावकरी मंडळी

पुसद प्रतिनिधी
करियर व कायदा विशेष संवाद या विषयावर पुसद तालुक्यातील ग्रामीण भागाला हर्षवर्धन बीजे सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हे भेटी देत आहेत.त्या संदर्भात दि. २५जुन रोजी मांडवा गावाला भेट देण्यात आली.

यावेळी हर्षवर्धन बीजे आय. पि. एस. सहाय्यक पोलीस अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांनी उपस्थित स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व ग्रामस्थांना करियर व कायदा विशेष संवाद या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामस्थांनी विविध समस्या बरोबरच पुसद ते शेबाळपिपरी रोडवर गावाजवळ गतीरोधक बसविण्यात यावा,पुसद शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन मांडवा हद्द फलक लावण्यात यावा अशा समस्या मांडण्यात आल्या.

यावेळी धम्मानंद केवटे पोलीस हवालदार, अल्का ढोले सरपंच, विजय राठोड उपसरपंच, दत्तराव पुलाते पोलीस पाटिल,सुधाकर चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष , एस टी तडसे ग्रामविकास अधिकारी ,सर्व प्रतिष्ठीत ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. टी.तडसे ग्रामविकास अधिकारी यांनी तर आभार दत्तराव पुलाते पोलीस पाटिल यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *