लाखी, उडदी, ब्राह्मणगाव, भंडारी व राजना या गावाकडे खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..
पुसद :- तालुका हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा तालुका आहे. स्व. वसंतराव नाईक व स्व.सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री पुसद तालुक्यातील गवली या गावाचे होते. महाराष्ट्राला ह्या नर रत्नांनी राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. आज मात्र पुसद तालुक्याकडे आजूबाजू तालुक्यातील लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.पुसद तालुक्यातील अनेक गावाचे रस्ते ची अवस्था बिकट आहे. लाखी, उडदी, ब्राह्मणगाव, राजना आणि पारवा या मार्गाचे रस्ते खड्डेमय आहे. अनेक वर्ष झाले वारंवार आमदार इंद्रनील नाईक साहेब( राज्यमंत्री ) यांना विनंती करून सुद्धा या मार्गाचे रस्ते आज पर्यंत मार्गी लावला नाही. अनेक तक्रारी करून सुद्धा कित्येक दिवसापासून दुरुस्ती करणे सोडा या रस्त्यावरील खड्डे सुद्धा बुजवले नाही. आमदार इंद्रनील नाईक साहेब याची धर्मपत्नी श्रीमती मोहिनी ताई या रस्त्याने अनेक वेळा येजा करत असतात, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पण ताईसाहेब रस्ते पाणी या विषयाकडे लक्ष देत नाही.या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले,शिक्षक,कर्मचारी, शेतकरी गावात बेरोजगारी असल्याने बेरोजगार तरुण रोजगाराच्या शोधात तालुक्यात जाणे येणे करतात. तालुक्यातील आमदार व खासदार हे या गावी फक्त निवडणुकीच्या वेळेवरच या गावात येतात आणि केवळ निवडणूक च्या तोंडावर पोकळ आश्वासने देण्यासाठी कार्यकारी, पदाधिकारी गावात येतात निवडून झाल्यानंतर कोणीही या गावकऱ्यांचा वाली नसतो.शाळकरी मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी पाण्यांनी भरलेल्या खड्ड्यामुळे कित्येक वेळा शाळेत पोहोचण्यासाठी वेळ होतो. शिवाय रस्त्यावरील चिखलामुळे गाडी घसरून हात पाय मोडल्याच्या घटना सुद्धा घडलेले आहे. या गावकऱ्याकडे आमदार खासदार यांनी लक्ष देऊन रस्ते लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे ही अपेक्षा गावकऱ्यांची आहे. पुसद तालुका लगत असलेला वाशिम जिल्हा या गावाची तुलना लोक नेहमी करत असतात. वाशिम जिल्ह्यातील रस्ते पुसद तालुक्यापेक्षा कितीतरी चांगले आहेत अशी तुलना आज गावागावांमध्ये केली जात आहे.








