पुसद :-तालुक्यातील खेडेगाव माणिकडोह येथे ६/७/२०२५ रोजी १५ वे वित्त आयोग यांच्या अंतर्गत गावातील लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी गावातील तरुण तडफदार नेतृत्व करणारे कर्तव्यदक्ष नवनिर्वाचित उपसरपंच गजानन राठोड, ग्रामपंचायत चे सचिव भेदेकर साहेब यानी गावातील आरोग्य लक्षात घेता तातडीने घर परत डस्टबिन आणि जीवन ड्रॉप उपलब्ध करून दिले. या अनोख्या उपक्रमात गावाचे आशा सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील सामाजिक क्षेत्रात गोरगरिबासाठी रात्र दिवस झडणारे अविनाश भोजू राठोड, पंडित चव्हाण, अनिताताई आडे, मोहेकर ताई, आणि ग्रामपंचायत सदस्य तथा गावातील सामाजिक छोटे-मोठे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाची चर्चा आजूबाजूच्या गावामध्ये होताना दिसत आहे.








