Home » जीवनशैली » सामाजिक » हनुमान नगर कुंभारी गावाचे रस्ते चिखलमय…

हनुमान नगर कुंभारी गावाचे रस्ते चिखलमय…

Share:

पुसद :- तालुक्यातील हनुमान नगर कुंभारी या गावाचे रस्त्यांची फार वाईट  अवस्था झाली असून हनुमान नगर कुंभारी हे गाव विकासापासून फार दूर आहे असे चित्र दिसत आहे. गावातील लोकांना रस्त्यामुळे फार त्रास सहन करावा लागत आहे. चिखलमय  रस्त्यामुळे ये -जा करणाऱ्या गाड्या घसरून हातपाय मोडण्याच्या घटना सुद्धा घडलेली आहे.

    पुसद तालुक्यातील आमदार इंद्रनील नाईक यांना वेळोवेळी तक्रार करून सुद्धा कित्येक दिवसापासून दुरुस्ती करणे सोडा या रस्त्यावरील खड्डे आजपर्यंत बुजवले नाही.

महाराष्ट्र राज्यातील पुसद तालुक्यावर ७२ वर्षांपासून नाईक घराण्याचं वर्चस्व आहे. पुसद तालुक्यातील प्रत्येक गावातील रस्त्यांची दुरवस्था आज सुद्धा पाहायला मिळत आहे. हनुमान नगर कुंभारी गावाच्या सरपंच सुशिक्षित असून  सुद्धा या गावाची दूरवस्था पाहायला मिळत आहे. हनुमान नगर कुंभारी या गावाचे सरपंच असताना राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोलंबो येथे जाऊन आलेले आहे. अशा महिला सरपंचाचे गाव विकासापासून कोसो दूर असल्याचा भास होतो. गावकऱ्यांची आमदार साहेबांना एकच विनंती आहे की, गावाचे रस्त्यांचे काम लवकरात लवकर मार्गी लावावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *