Home » जीवनशैली » सामाजिक » वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कार्यशाळेचे आयोजन…

वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कार्यशाळेचे आयोजन…

Share:


कनेरवाडी वार्ता :-युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय त करियर व कायदा विषय संवाद या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे . हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवक मंडळाचे सचिव विजय भाऊ जाधव, युवक मंडळाचे उपाध्यक्ष तथा रीना स्पोर्ट क्लबचे संचालक देव भाऊ जाधव, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद वानखेडे, वसंत नगर, पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे,, सौ. पूजा जाधव,पोलीस हवालदार धम्मनंद केवटे ,विचारपीठावर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख भाऊ मोहिते, शकुंतलाबाई देशमुख उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बालाजी भवानकर. प्राचार्य बंडू खराटे, मुख्याध्यापक पंजाब जवादे, भाऊ आमटे,प्राचार्य अनिल कुरमे, पर्यवेक्षक शिवशंकर घरडे, हे व्यासपीठावर उपस्थित होते .
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण, प्राचार्य अनिल कुरम,यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. कु. रश्मी डेकाटे,यांनी केले तसेच आभार अविनाश राठोड राठोड यांनी मानले अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन बीजे यांनी कायद्याचे ज्ञान, मोबाईल पासून दूर राहावे नियमित अभ्यास करा आणि माझ्यासारखे मोठे अधिकारी होण्याचे भाग्य लाभेल पर्यायाने देश सेवा तुमच्या हातून घडो असे प्रतिपादन केले. आणि विद्यार्थ्याच्या समस्यावर प्रश्न उत्तरातून संवाद साधला.
         या कार्यक्रमाचे यशस्वी ते करता राजेश बुरबुरे, प्रा. नरेश राठोड, प्रा.शेषराव राठोड, कुं.वंदना पोले, संजय राठोड, अभिजीत राठोड, विष्णू इंगळे, बाळासाहेब कराळे, भूमेश्वर डोक, विजय राठोड, महेश चव्हाण ,पी.एच .जाधव ,युवराज जाधव विलास चिकणे आशिष राठोड, ए. एम .राठोड कु .सुलक्षणा राठोड, नीरज चव्हाण, यांची अथक परिश्रम लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *