Home » आरोग्य » शालेय “आरोग्य दिन” उत्साहात साजरा…

शालेय “आरोग्य दिन” उत्साहात साजरा…

Share:


पुसद: तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 15 जुलै 2025 रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक भास्कर मुकाडे व प्रा .शालिक वाघमारे हे विचार पिठावर उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर मुकाडे यांनी केले यावेळी त्यांनी जीवनशैली व आरोग्य या विषयाचे महत्त्व समजावून सांगितले.पा. वाघमारे यांनी आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे ,हे विधान उदाहरणे देऊन समजावून सांगितले .कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपणास आपल्या जीवनशैलीत बदल करावे लागतील. उशिरा झोपणे, उशिरा उठणे तसेच पाणी पिण्याच्या व जेवनाच्या वेळेत सतत बदल करणे हे जरी आपणास साधे वाटत असले तरी असे बदल करणे हे घातक आहे, या बदलामुळे आपले आरोग्य बिघडते. तसेच आपणास मोठे आजाराला सामोरे जावे लागते आपण निसर्गाचे छोटे छोटे नियम पाळले तर आपले आरोग्य निश्चितच उत्तम राहील यात कोणतीही शंका नाही सर्व वागणे हे आपल्याच हाती आहे. असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय असोले यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारजा वाढोन कर ,विजय वंजारे, विठ्ठल ढाले, रमेश तडसे, भीमराव मनवर ,प्रा .दतराव काळबांडे, प्रा .योगेश आडे ,गजानन नरोटे, संभाजी जाधव ,गणेशराव जाधव, शंकरराव आसोले, विष्णू नप्ते ,जीवन राठोड, वेदांत मारकड, वैभव जाधव, विठ्ठल पोले ,पांडुरंग मारकडसह सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *