पुसद:- तालुक्यातील पुसद ते राजना,लाखी, ब्राह्मणगाव रस्त्याची अवस्था फार वाईट आहे. राजना ब्राह्मणगाव, लाखी मार्गाने जाणारे प्रवासी ना खूप त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा अपघात पण झाले. पुसद तालुक्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांना अनेक वेळा रस्त्याचे काम मार्गी लावा असे अनेक नागरिकांनी विनंती केली. तरीपण आमदार साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मोहिनी ताई या प्रकरणाकडे दुर्लक्ष वारंवार करत आहे असे नागरिक सांगत आहे.
आज दिनांक२१/०७/२०२५ सोमवार रोजी अखिल भारतीय बंजारा संघर्ष सेना पदाधिकारी दिनकर सुदाम राठोड ब्राह्मणगाव या नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रस्ते संदर्भात विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अधिकारी साहेब व कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते. दिनकर राठोड यांनी विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाला नाही. जर असे प्रकार होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असेल. गोरगरिबांचे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम पूर्ण होत असेल का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
आमदार साहेबांचे पुसद तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्यांचा ताबा नसल्यासारखा या ठिकाणी दिसत आहे. आमदार साहेबांना अनेक विनंती करून सुद्धा रस्ते मार्गी लागत नाही. आम्हाला काही नको साहेब आम्हाला फक्त रस्ते द्या हो! रस्ते द्या अशी विनंती नागरिक करत आहे.








