दिल्ली येथे प्रवेश करता वेळेस माननीय ययाती भाऊ नाईक
दिल्ली :- महाराष्ट्रातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराणे भारतात प्रसिद्ध आहे. या नाईक घराण्याचा मोठा इतिहास आपल्याला सांगता येईल. नाईक घराण्याची ७२ वर्षापासून एक हाती सत्ता आजपर्यंत आहे. काही काळी काँग्रेस यांच्याशी एक निष्ठपणे राहणारे घराणे म्हणून त्यांची भारतात ओळख होती. काही काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय श्री मनोहर नाईक (माजी मंत्री) यांनी प्रवेश केला होता. आज दिनांक२३/०७/२०२५ रोजी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय. वसंतराव नाईक यांचे नातू तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय.सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री श्री. मनोहर नाईक यांचे मोठे चिरंजीव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यमंत्री मा. इंद्रनिल नाईक यांचे मोठे बंधू यांनी आज दिल्ली येथे भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
मा. ययातिभाऊ नाईक भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करता वेळी,भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव मा. अरुण सिंग यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक भारतीय जनता पार्टीचे मा. रवींद्र सिंग ठाकूर तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अरविंद मेमन, आणि राज्यसभा सदस्य मा. सुधांशू त्रिवेदी साहेब उपस्थित होते.








