पुसद.:- तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे शालेय निवडणूक घेण्यात आली. ही प्रक्रिया कशी चालते, ते मुलांना प्रत्यक्ष अनुभवता आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून कु. अमृता घोलप सहाय्यक अधिकारी म्हणून कु. तनवी चव्हाण ,कु. रिया पातोडे या मुलींनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. वर्गातील वर्ग प्रमुख म्हणजेच वर्ग मंत्री यासाठी प्राचार्य पंडितराव मस्के व प्रा. योगेश आडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक (ई.व्ही.एम .)च्या साह्याने घेण्यात आली .यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक आयोग (ई.व्ही.एम.) च्या साह्याने कशाप्रकारे पार पडतात याबद्दलची प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान मिळाले. आपण आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर लांब बीपचा आवाज येतो म्हणजे आपले मतदान यशस्वी झाले. हे मुलांना प्रत्यक्ष कृतीतून समजले .यावेळी प्रत्येक वर्गातून पाच उमेदवारांची नोंदणी करण्यात आली .ज्या उमेदवाराला (विद्यार्थ्याला) जास्त मते मिळाली तो वर्गप्रमुख. त्यापेक्षा कमी मते ज्या उमेदवाराला मिळाली तो उपवर्ग प्रमुख म्हणून काम करेल, असे सांगण्यात आले .तसेच यावेळी शालेय प्रमुख( स्कूल कॅप्टन )म्हणून साईनाथ आवळे व उपप्रमुख रोहन खेडकर यांची निवड करण्यात आली. मतदान करायला जात असतांना सोबत आपले कोणतेही एक ओळखपत्र सोबत न्यावे लागते हे मुलांना समजले. भारत निवडणूक आयोग यांचे काम कसे चालते ?तसेच निवडणुका किती वर्षांनी होतात? राज्य निवडणूक आयोगाद्वारे कोणत्या निवडणुका घेतल्या जातात ?याबद्दलचे जेष्ठ शिक्षक भास्कर मुकाडे यांनी विद्यार्थ्यांना भरपूर माहिती दिली .तसेच निवडणुका ह्या टप्प्याटप्प्याने का घेतल्या जातात हे देखील त्यांनी समजावून सांगितले. वर्ग नायकाचे काम काय आहे? त्यांनी कसे वागावे ?प्रत्येकांनी शालेय नियमांचे पालन करावे, अशी शपथ सर्व वर्ग प्रमुखांना देण्यात आली. वर्ग शांत ठेवणे, तसेच स्वच्छ ठेवणे हे फार गरजेचे आहे. असे प्रा .योगेश आडे यांनी सांगितले .यावेळी मुख्याध्यापक पंडितराव मस्के यांनी सर्व वर्ग प्रमुखांचे स्वागत केले व सर्वांना मोठी नोंदवही सप्रेम भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश तडसे, प्रा .शालिक वाघमारे, संजय असोले ,दतराव काळबांडे, गजानन नरोटे ,संभाजी जाधव ,विठ्ठल ढाले ,भिमराव मनवर ,विजय वंजारे, सारजा वाढोनकर ,शंकरराव आसोले ,गणेशराव जाधव, विष्णू नप्ते,जीवन राठोड, वेदांत मार्कड ,वैभव जाधव, विठ्ठल पोले ,पांडुरंग मार्कड, सुरज मार्कड ,इत्यादींनी सहकार्य केले .शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








