बेलोरा ते पांढुर्णा केदरलिंग राज्यमार्गावरील जीर्ण झालेला पूल मागील चार वर्षापासून पुल खचून जात आहे.
बेलोरा – पुसद तालुक्यातील मारवाडी, बेलोरा, पांढुर्णा केदरालिंग वरून जाणारा महत्वाचा राज्यमार्ग 214 क्रमांक असून विदर्भ – मराठवाडयाल्या जोडनारा रस्ता आहे. मागील दोन दिवस पासून झालेल्या पावसाने रस्त्यावरील जीर्ण झालेला परत यावर्षी सुद्धा पुल खचून गेल्यामुळे अर्धा रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे..मागील चार वर्षांपासून पुलाची थातुर माथूर डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आले होते, सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने विदर्भ व मराठवाड्याला जोडणाऱ्या राज्यमार्गावरील जीर्ण झालेला पुल खचून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे पितळ दरवर्षी उघडे पडत आहे. राज्यमार्ग क्रमांक 214 वरील बेलोरा ते पांढुर्णा केदरालींग मार्गावरील मराठवाड्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असून पावसाळ्यात मागील चार वर्षांपासून हा पुल पूर्णपणे खचून जात आहे. वारंवार रस्ता पुल खचून रस्ता उखडून जात आहे. हिंगोली ते कळमनुरी, शेंबाळपिंपरी मार्गे पुसद जाणारा रस्ता पुराचे पाणी पुलावरुन जात असल्याने रस्ता बंद झाला होता हिंगोली सिरसम बेलोरा मार्गे पुसद या रस्त्याने वाहतूक वळविण्यात आल्याने वाहनाची वर्दळ या मार्गावर वाढलेली होती अशातच या राज्य मार्गावरील पूल खचून गेल्याने एखादी मोठी दुर्घटना घडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकामाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दरवर्षी पाहणी करतात कृती मात्र शून्य
बेलोरा येथील बाळू मामा मंदिर जवळ रस्त्यावर पाणी साचत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दरवर्षी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करून जातात.दोन वर्षापासून मंदिर परिसरात पाइप तसेच पडून आहेत पाईप टाकून देऊ असे आश्वासन दिले होते त्या गोष्टीला दोन वर्षे होऊन गेले. पाईप रस्त्याच्या कडेला येऊन पडले आहेत पण प्रत्येक्षात पावसाळा येऊन सुद्धा रस्ता खोदून पाईप टाकण्यात आलेले नाही…त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालेले आहे..
सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालून पुलाची उंची वाढवून पुलाचे नव्याने काम करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे….








