Home » जीवनशैली » सामाजिक » रस्त्यावर सापडलेले ६० हजार रु परत करुन शिक्षिकेने दिला प्रामाणिकतेचा परिचय

रस्त्यावर सापडलेले ६० हजार रु परत करुन शिक्षिकेने दिला प्रामाणिकतेचा परिचय

Share:

बेलोरा:- पुसद तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोंढी येथील सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुवर्णाताई चौधरी (मोरे ) रा स्वप्न पूर्ती नगर पुसद यांना सापडलेले ६० हजार रु त्यांनी ते मुळ मालकाला परत करून प्रामाणिक तेचा परिचय करून दिला. दोन दिवसापूर्वी सुवर्णा ताई मॅडम सकाळी १० वाजताच्या सुमारास घरून शाळेत निघाल्या व घरापासून काही अंतरावर जात असताना रस्त्यावर रबर मध्ये गुंडाळून असलेल्या १०० व ५०० च्या नोटांचं रोख रक्कम ६० हजार रु चे बंडल त्यांना सापडलं मॅडम ने लगेच आजूबाजूला बघितले असता त्यांना कोणी ही काही आढळून आले नाही म्हणून मॅडम ने पैसे घेऊन शाळेत गेल्या व सायंकाळी घरी परतल्यावर पती अजय मोरे सर यांना सर्व वृतांत सांगितलं व पती अजय मोरे सर यांनी माहिती काढली असता रोहित जयस्वाल यांचे पैसे हरवले आहे असे समजले व ते पैसे रोहित जयस्वाल यांचे आहेत त्या नंतर मोरे सर यांनी सर्व शहाणीश्या करून ते पैसे रोहित जयस्वाल ( व्यापारी )यांना परत केले. विद्यादानाचे कार्य करतांना विध्यार्थ्यांना प्रामाणिकपनाचा धडा न शिकविता तो आचरणात आणणाऱ्या सुवर्णाताई चौधरी यांचा जि प शाळा चोंढी येथे सर्व शिक्षक कर्मचारी वृदा तर्फे पुस्पगुच्छ देऊन सुवर्णा ताई यांचा सत्कार करण्यात आला व सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *