अनुसूचित जमातीसाठी राखीव १२५०० व ८५०००रिक्त पदाच्या विशेष भरती तात्काळ करा
पुसद प्रतिनिधी
अनुसूचित जमातीच्या युवक युवतींना शासनाकडून राखीव पदाचा हक्क मिळावा त्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे.सध्या राज्यात अनुसूचित जमातीचे १२५०० राखीव पदे व ८५००० रिक्त पदे दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. ही भरती प्रक्रिया होत नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांन मध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून अनेक विद्यार्थी अमर उपोषणाला बसलेली आहे.या उपोषणाला आदिवासी करण्याचे संघटना महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन एनजीपी ५८८७ यांचा आज जाहीर पाठिंबा दर्शवीत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला व त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. शासनाने याची ताबडतोब दाखल घेऊन न्यायाधीवा हीच आमची मागणी आहे.
आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत 1)अनुसूचित जमातीच्या १२५०० पदाची भरती तात्काळ सुरू करण्यात यावी.
2) शासनाच्या विविध विभागातील अनुसूचित जमातीच्या ८५००० रिक्त पदाची भरती तातडीने पूर्ण करण्यात यावी.
3) उपोषणास बसलेल्या
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा.
जर शासनाने न्याय मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर आम्हाला संघटनेच्या वतीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल!
त्यामुळे आपण योग्य ती कारवाई करून आमच्या मागण्याची पूर्तता करावी.
असे निवेदन देण्यात आले त्यावेळी खालील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते श्री. लक्ष्मण टारफे (राज्याध्यक्ष आदिवासी कर्मचारी संघटना ) दिनेश खेकाळे (सचिव)
गजानन बेले (सहसचिव),सुखदेव फोपसे जिल्हाध्यक्ष यवतमाळ, केशव मस्के साहेब, गजानन उघडे, कैलास बोंबले, दादाराव टारफे, विवेक खेकाळे, शंकर माहुरे, विश्वनाथ रणमले, पुंजाराम इंगळे, देवराव मुरमुरे, काशिनाथ बोके, देवानंद बुरकुले, गोविंद मार्कड, संदीप ससाने, काशिनाथ धुमाळे, अनिल दुम्हारे, वाघजी ससाने, संजय कुरुडे, दुलाजी कुरकुटे, संजय उघडे गंगाराम पाचपुते व चंद्रकांत मळघने इत्यादी आदिवासी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.








