Home » जीवनशैली » सामाजिक » डॉ. सचिन पवार गोरगरीब रुग्णासाठी ठरतायत ईश्वर रुपी अवतार…

डॉ. सचिन पवार गोरगरीब रुग्णासाठी ठरतायत ईश्वर रुपी अवतार…

Share:

राजना वार्ता :-
आजच्या काळामध्ये पैसा म्हणजे सर्व काही जिथे पैसा दिसला तिथे लोक पळतात ते ध्येयाच्या बाबतीत असो किंवा स्वप्नाच्या बाबतीत लोक स्वप्न पण असे बघतात की ज्यात आपल्याला पैसा भरपूर मिळेल मग प्रश्न असा निर्माण होतो की पैसा म्हणजे सर्व काही का? माणसाला आयुष्यात पैसा मिळाला म्हणजे सर्व मिळाला असं समजावं का? हे प्रश्न सध्या स्थितीत आपल्याला पडतात. पण अत्यंत गरिबाच्या परिस्थितीतून आपला शिक्षण पूर्ण करून कष्टाच्या घामाने आपला आयुष्यात उजेड आणावा व ते लोकांना समर्पित करावं असं कुठे बघितले का? खरंच आश्चर्य  चकित करणारे गोष्ट आहे. ते म्हणजे डॉक्टर सचिन पवार एका छोट्या खेडेगावात वाढलेला व खेड्याच्या समस्या जाणणारा एक प्रामाणिक मुलगा डॉक्टर होण्यासाठी सतत झटत राहिला व त्याच्या प्रयत्नाचे फळ म्हणजे तो वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर झाला. तेव्हापासून आज पर्यंत लोकांना योग्य उपचार देण्याचे काम करत आहेत. पण आजच्या काळात डॉक्टर पैसा कमवण्यासाठी या हेतूने उपचार करत असतात. पण डॉक्टर सचिन पवार यांनी लोकांच्या घरी गावोगावी खेड्या गावात जाऊन मोफत उपचार करत आहे. लोकसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून डॉक्टर सचिन पवार हे आपले काम प्रामाणिकपणे गरजू गोरगरीब रुग्णांसाठी उपचार करताना दिसत आहे. खरोखर ही बाब अभिमानास्पद आहे. लोकांशी संपर्क साधताना लोकांनी डॉक्टर सचिन पवार यांना ईश्वर दीर्घ आयुष्य देवो असे  ईश्वरचरणी लोकांनी प्रार्थना केली. अनेक दिवसापासून प्रत्येक गावोगावी जाऊन जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न डॉक्टर सचिन पवार जात धर्म न बघता प्रत्येक रुग्णांची सेवा तन-मन-धनाने करत आहेत. आज दि. ३०/८/२०२५रोजी गोस्ता या गावी जाऊन रुग्णाशी संपर्क साधून प्रत्यक्षात उपचार दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *