राजना ते अनसिंग रस्त्याची दुरावस्था झाली असून तेथील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत. व नव्याने चांगला रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी तयार करावा. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राजना ते लाखी अनसिंग रस्त्याची दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.रस्त्यावरून जाण्या- येण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक वेळा शेती कामासाठी व शहरात अनसिंग येथे दररोज प्रवास करतात. मात्र वारंवार त्यांना खड्ड्याचा मोठा सामना करावा लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी. अशी मागणी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील, तंडा मुक्त अध्यक्ष, आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मधून होत आहे. या रस्त्याने अनेक वाहने ये- जा करतात. यामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. खड्डेमय रस्त्यामुळे सर्वच वाहनधारक त्रस्त झाल्याने दिसून येत आहे.








