प्राध्यापक शेषराव राठोड, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी
पुसद :- तालुक्यातील युवक मंडळ, पुसद द्वारा संचालित , वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पुसद येथे आज दिनांक १/१०/२०२५ रोजी कन्या पूजन व रास गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कुरमे सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी युवक मंडळाचे सचिव विजय भाऊ जाधव व संचालिका सौ. संगीताताई वडते , सौ पुजा जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते मोठ्या संख्येने मुलीचे कन्या पूजन करण्यात आले. आणि विद्यार्थ्यामध्ये सांस्कृतिक एकता व उत्साह वाढविण्यासाठी रास गरबा व दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले. रास गरबा व दांडिया कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी रंग बी रंगे ड्रेस परिधान करून प्रचंड प्रमाणात सहभाग घेऊन नृत्यचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या प्रा. कु. रश्मी डेकाटे,यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.वंदना पोले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिवशंकर घरडे, राजेश बुरबुरे, प्रा.नरेश राठोड,प्रा. शेषराव राठोड, संजय राठोड, अभिजीत राठोड अविनाश राठोड विष्णू इंगळे, बाळासाहेब कराळे भूमेश्वर डोक ,विजय राठोड महेश चव्हाण, पांडुरंग जाधव अमोल राठोड,यांनी केले,कार्यक्रमाकरिता समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.








