पुसद ते राजना आणि पुसद ते लाखी ३५ किलोमीटरचा ग्रामीण मार्ग असून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून पाय चालणे देखील मुश्किल झालेले आहे. या रस्त्याची ही अवस्था ३ वर्षापेक्षा जास्त दिवसापासून असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्या परिस्थितीत रस्ते वाहतूक व बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेऊन फक्त बघण्याची भूमिका अनुभवत आहे. या रस्त्यांच्या कामासाठी राजना, भंडारी, ब्राह्मणगाव, लाखी, पारवा, उडदी, पांडूर्णा, चिखली, जाबबाजार येथील नागरिक सतत तक्रारी करत आहे. कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा कुठला आहे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आमदारावर आणि प्रशासना विरोधात रोष दिसत आहे. तरी प्रशासनाने या रस्त्याची तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर संपूर्ण रस्त्याचे काम व्हावी अशी मागणी अखिल भारतीय बंजारा संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर सुदाम राठोड यांनी केली आहे. जर असे झाले नाही तर दिनकर सुदाम राठोड हे येत्या ९/१०/२०२५ पासून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू करेल अशी माहिती पत्राद्वारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद ला दिली आहे.








