छत्रपती संभाजीनगर :-येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळील वसंतराव नाईक चौकातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा उड्डान पुलामुळे रस्त्याच्या मध्यभागी आलेला होता. त्यामुळे रहदारीला अडथळा येत असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे होते. मागील वर्षी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी बंजारा समाजाशी सुसंवाद साधुन सदरील पुतळा अन्य ठिकाणी हलविण्याचा प्रस्ताव मांडला होता. बंजारा समाजाने सदरील प्रस्ताव सशर्त मान्य केला होता. नवीन जागेवर नवीन पुतळा बसविण्याची पूर्ण तयारी झाल्यामुळे आज जुना पुतळा हलविण्यात आला. तत्पूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांनी नाईक साहेबांना अभिवादन केले.
याप्रसंगी माजी उपमहापौर प्रमोद राठोड, फुलसिंग जाधव, उत्तम चव्हाण, राजेंद्र राठोड, रमेश पवार, विनोद जाधव, गोरख चव्हाण, डॉ.कृष्णा राठोड, अशोक राठोड, प्राचार्य पृथ्वीराज पवार, रोहिदास पवार, अनिल चव्हाण, जयकुमार राठोड, बद्रीनाथ राठोड, प्रा. मांगीलाल राठोड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.








