Home » जीवनशैली » सामाजिक » श्री सत्यसाई सेवा समिती कडुन मांडवा शांतीधामात श्रमदान

श्री सत्यसाई सेवा समिती कडुन मांडवा शांतीधामात श्रमदान

Share:

पुसद प्रतिनिधी
श्री सत्यसाई सेवा समिती पुसद
अंतर्गत तालुक्यातील दत्तक ग्राम मांडवा येथे दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी अवघ्या २० मिनिटात ५७० विविध प्रजातीच्या रोपट्यांचे तसेच समिती व ग्रामपंचायत कार्यालय आणि लोकसहभागातून आतापर्यंत जयंती, पुण्यतिथी, तसेच वृक्ष देऊन वाढदिवस साजरा अशा विविध उपक्रमांतर्गत एकुण ७२२रोपट्याचे रोपण करण्यात आले आहे.

या दत्तक ग्राम मांडवा शांतीधामात श्री सत्यसाई सेवा समितीच्या वतीने गवत काढणे, आळे करणे, झाडांची छटई करून श्रमदान करण्यात आले.

यावेळी श्री सत्यसाई सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष गजानन आरगुलवार,मिडिया जिल्हा समन्वयक बालाजी बंडेवार, जिल्हा सेवा समन्वयक डॉ. संदिप चव्हाण, डॉ. सुधीर पापीनवार, प्रा. उत्तम राठोड,जिल्हा सेवा महिला समन्वयक स्मिता आरगुलवार, जिल्हा आध्यात्मिक महिला सहाय्यक समन्वयक कीर्ती काजळे, ममता चव्हाण, भावना पापीनवार, कल्पना बंडेवार, वैशाली रणमले, संगिता राठोड , छाया विश्वकर्मा, रमेश ढोले, कैलास राठोड, अश्विन आबाळे, ग्राम पंचायत कर्मचारी प्रदम्न आबाळे,आणि इत्यादी साई भक्तानी स्वच्छतेकडून दिव्यात्वकडे या कार्यक्रमात तसेच इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *