Home » जीवनशैली » सामाजिक » बोधिसत्व बुद्धविहाराच्या लोकार्पण सोहळयासाठी तन-मन-धनाने सहकार्य करा- रवि भगत

बोधिसत्व बुद्धविहाराच्या लोकार्पण सोहळयासाठी तन-मन-धनाने सहकार्य करा- रवि भगत

Share:


पुसद प्रतिनिधी
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते बोधिसत्व बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याची दि.२८/१२/२०२५ ही तारीख दिली असुन यवतमाळ जिल्हा पूर्व व पश्चिम चे वतीने हा लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी मंडळी तथा उपासक उपासिका यांनी तन मन धनाने सहकार्य करण्याची गरज आहे असे मत रवी भगत यांनी दि. १८ ऑक्टोंबर रोजी आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले. यावेळी मोहन भवरे जिल्हाधक्ष, मोरेश्वर देवतळे सरचिटणिस पूर्व, समिती सदस्य आद. राहुल राऊत, गौतम कुंभारे, किशोर उके उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन भवरे जिल्हाध्यक्ष यांनी केले. तालुकाध्यक्ष भारत कांबळे पुसद, संतोष जीवने घाटंजी, सिध्दार्थ गायकवाड दारव्हा,सिद्धार्थ बन्सोड यवतमाळ, सचिन वानखेडे वणी, दिपक वंजारी पांढरकवडा, तालुका प्रतिनिधी भगवान इंगळे मारेगाव, किशोर आळणे महागाव, महिला प्रतिनिधी शिलाताई जनपदकर पांढरकवडा, संगिताताई कुंभारे तालुकाध्यक्ष यवतमाळ इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले.
मोरेश्वर देवतळे सरचिटणीस यांनी पत्रकाचे वाचन केले. समिती सदस्य गौतम कुंभारे,राहुल राऊत यांनी भाष्य केले.
या वेळी कांचनाताई अंबागडे यांनी दरवाजा साठी 20000/- रुपयाचे दान नगदी दिले. कार्यक्रमात ल. पु. कांबळे यांचा बौद्धाचार्य प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. घाटंजी, वणी, पुसद येथील प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन रुपेश वानखडे केले तर सुवर्णाताई बागेश्वर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास पश्चिम व पूर्व जिल्हा व सर्व तालुका शाखेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षिका,केंद्रिय शिक्षक,बौध्दाचार्य उपस्थित होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *