पुसद प्रतिनिधी
एक तरी वृक्ष देऊन वाढदिवस साजरा करावा हा उपक्रम आपल्या गावात राबविला जात आहे. त्याचे फलित आज खडकाळ स्मशानभूमीला हिरवळ पसरविली गेली . जणु बागेचे रुप आले.राबविताना जरीही छोटे छोटे उपक्रम वाटत असले तरीही भविष्यात ते परिवर्तन घडवित असतात. असे मत एस. टी. तडसे ग्रामविकास अधिकारी यांनी सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यक्त केले.
नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळ यांनी दुर्गा उत्सर्जनाच्या वेळी डी.जे चा खर्च टाळू गावातील सार्वजनिक ठिकाणी तार कुंपण करून एक आदर्श निर्माण केला. या उपक्रमाला कौतुकाची थाप म्हणून ग्रामपंचायतीने नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळाच्या संपूर्ण पदाधिकारी मंडळीचा सत्कार केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय राठोड उपसरपंच, दत्तराव पुलाते पोलीस पाटील, वसंता आडे सोसायटीचे अध्यक्ष, रमेश ढोले, दादाराव पुलाते, दसरथ राठोड, गजानन आबाळे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रदुम्न आबाळे, राहुल जाधव इत्यादी मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळु धाड यांनी केले तर आभार कैलास राठोड यांनी मानले.








