इंग्रजांचे अनेक देशांवर राज्य होते. त्याचप्रमाणे भारतावर देखील इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केले. इंग्रजांनी भारतीय जनतेला अनेक जाचक अटींनी बांधण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुस्लिम ह्या धर्मातील लोकांमध्ये फूट पाडली. इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध अनेक देशाबद्दल आत्मीयता असलेले देशभक्त पुढे आले. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले. अशा या देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात लोकांमध्ये स्पुरण येण्यासाठी काही गीतांच्या रचना केल्या. त्यापैकी ‘वंदे मातरम ‘हे गीत तयार करण्यात आले. हे गीत बकीमचंद्र चॅटर्जी यांनी तयार केले. वंदे मातरम क्रांतिकारकांच्या चळवळीचा महामंत्र ठरले. मातृभूमी बद्दल प्रेम असल्यासंदर्भात वेदांमध्ये वर्णन केलेले आढळून येते. भारतीय वैदीक काळात तैतरीय उपनिषदात मातृभूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे नमूद करण्यात आलेले आहे. वंदे मातरम हा विचार केवळ स्वातंत्र्यासाठी नाही. अथर्व वेदामध्ये पृथ्वी सूक्त म्हणून भूमीचा गौरव करण्यात आलेला आहे. भारतातील सिंधू संस्कृतीत मातृभूमीला प्राधान्य देण्यात आलेली आहे. बकिमचंद्र चॅटर्जी यांचे आडनाव चट्टोपाध्याय हे होते. बकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म२६ जून १८३८ या दिवशी बंगालमधील कांटालपाडा या गावात झाला. कांटालपाडा हे गाव हुगळी जवळ आहे. कांटालपाडा हे एक खेडेगाव होते. निसर्गाने चोहोबाजूंनी झाडांनी बहरलेले हे गाव. नारळाची, बांबूंची झाडे सर्वत्र गावाच्या चौफेर दिसत होती. निसर्गाने जणू ताब्यात घेतलेले हे गाव. सुंदर वातावरण, शांत, नीरव असे अप्रतिम गाव. या गावाजवळ भाटपाडा हे संस्कृतच्या विद्वत परंपरेसाठी प्रसिद्ध होते. बकिमचंद्र चॅटर्जी यांचे मुळगाव कांटालपाडा नाही. बकिमचंद्रांचे पंजोबा रामहरी चॅटर्जी या खेड्यात येऊन स्थायिक झाले. वकील चंद्राच्या आईचे मामा भवानीचरण हे संस्कृतचे थोर पंडित होते. बकिमचंद्रांना भवानीचरण यांनी लिहिलेले संस्कृत ग्रंथ त्यांना मिळाले. बकीम चंद्रांच्या वडिलांना चार मुले होती त्यातील सर्वात लहान म्हणजे बकीमचंद्र चॅटर्जी होते. बकिमचंद्राचे वडील सरकारी नोकरीत होते. जादबचंद्रांनी बकीमचंद्रांना शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक घरी केलेली होती. वडिलांची बदली जिल्हास्तरावर झाल्यावर बकिमचंद्रांनी इंग्रजी भाषा अवगत केली.१८४९ मध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणास प्रारंभ केला. महाविद्यालयात विल्यम शेक्सपियर, विल्यम वर्ल्ड स्वर्थ , गोल्ड स्मिथ या लेखक विद्वानांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. बकीमचंद्र थोर कवी, लेखक, संगीताची जाण असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. राजमोहनस् वाइफ ही त्यांची कादंबरी आहे. ही त्यांची पहिली कादंबरी होय. वंदे मातरम हे गीत ‘आनंदमठ ‘या कादंबरीत लिहिलेले आढळते. या कादंबरीत पहिल्या प्रकरणाच्या दहाव्या भागात वंदे मातरम हे गीत आलेले आहे. हे गीत बकिमचंद्रांनी खूप अगोदर लिहिलेले आहे. ७ नोव्हेंबर १९७५ साली लिहिले गेले. या कादंबरीवर ब्रिटिशांनी टीका केली. बकिमचंद्र हे सब-डेप्युटी होते. इंग्रजांच्या सत्तेत ती नोकरीला होते. बकीमचंद्र चॅटर्जी यांचे प्रेरणास्थान वासुदेव बळवंत फडके हे होते. बकिमचंद्र कलकत्त्याहून रेल्वेने जात असताना भारताची भूमी सुजलाम सुफलाम त्यांना वाटली म्हणून त्यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. हे गीत संस्कृत मध्ये आहे. त्यात बंगाली भाषेचा प्रभाव आहे. हे गीत बारा कडव्यांचे आहे. त्यातील दोनच कडवे मान्य करण्यात आले. मातृभूमी बद्दल यामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. मुस्लिम मूर्तिपूजा मानत नसल्याने त्यांनी वंदे मातरम ह्या मोठ्या गीतातील देवी या शब्दाला विरोध केला. त्यांच्या विरोधातून त्यातील दहा कडवे कमी करण्यात आले. हे गीत कोणत्या एका धर्माचे असूनही म्हणून दोन कडवे ज्यामध्ये केवळ भूमी मातेचा उल्लेख आहे तेच कडवे अंतिम करण्यात आले. वंदे मातरम हे गीत राष्ट्रगीत जनगणमन ह्या अगोदर लिहिले गेलेले आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम या गीताला संगीतबद्ध केले. आनंदमठ या बंगाली कादंबरीत संपूर्ण वंदे मातरम हे गीत दिलेले आहे. बकिमचंद्रांनी अनेक प्रकारचे साहित्य लिहिले. त्यात कथा, कादंबरी, काव्य, विनोद, पत्रे, विज्ञान रहस्य, निबंध, अनुवाद,तसेच संपादन केलेले आहे. स्टेट्समन या वृत्तपत्रात इंग्रजा विरोधात लिखाणही केलेले आहे. वंदे मातरम हे आपल्या मातृभूमीचे गुणगान आहे. मातृभूमीला त्यांनी देवीची उपमा दिलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम हे ब्रीद वाक्य अनेक महापुरुषांनी वापरले. वंदे मातरम नावाने घोषणा दिली जाते. वंदे मातरम हे देशाबद्दलचे प्रेम जागृत करणारे घोषवाक्य आहे . एका संस्थेच्या सूचनेनुसार वंदे मातरम या गीताला १५० वर्ष झाल्यामुळे त्याचे स्मरण करण्यासाठी सरकारने शाळेमध्ये या गीताचे कृतज्ञता पूर्वक आठवण म्हणून स्मरावे म्हणून सात नोव्हेंबर ला या गीता संदर्भात शासनाने परिपत्रक काढून जनजागृती करण्याचे ठरविले आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात कोणत्या गीतामुळे स्वातंत्र्यवीर प्रभावी झाले हे नव्या पिढीला स्मरावे म्हणून ७ नोव्हेंबरला या गीताबद्दल जागृती करण्याचे ठरविले आहे.२४ जानेवारी १९५० ला वंदे मातरम या गीताला अधिकृत मान्यता देण्यात आली. त्यातील दोन कडवे मान्य करण्यात आली. ते म्हणजेच आजचे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत होय. भारताच्या राज्यघटनेने वंदे मातरम व जनगणमन हे दोन गीत राष्ट्रीय गीते म्हणून जाहीर केली.








