राजना (ता.पुसद) — जिल्हा परिषदेच्या शाळा राजना येथे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या लोकवर्गणीतून शाळेस आवश्यक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. शाळेला स्पीकर, अँप्लिफायर, माईक, लेझीम, दोरी, रिंग तसेच लोखंडी गेट अशा विविध साहित्यांची भेट देण्यात आली.
या प्रसंगी पारवा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. होंडे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून साहित्याचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी मळगणे सर, श्रावण श्रीरामे, नंदू पवार, ठोंबरे,काळे सर, दुम्हारे सर, दूध सर तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.
माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.








