Home » जीवनशैली » सामाजिक » आदिवासींच्या स्वाभिमानाचे प्रतीक क्रांतिकारी बिरसा मुंडा !!!

आदिवासींच्या स्वाभिमानाचे प्रतीक क्रांतिकारी बिरसा मुंडा !!!

Share:

भारतामध्ये आदिवासींच्या अनेक जमाती दिसून येतात. भारताच्या या जमाती मूळनिवासी असल्याचे मानले जाते. भारतामध्ये आर्य आल्यानंतर या जमातींनी त्या परकीयांशी लढून मुत्सदेगिरी दाखवली. अतिशय काटक, स्वाभिमानी, कणखर जमात म्हणून त्यांचे नावलौकिक होते. आर्यांनी कपटाने या जमातींना हरविले. या जमाती हरल्या परंतु त्यांनी आर्यांची गुलामगिरी स्वीकारली नाही. अखेर स्वाभिमानाने त्यांनी जंगलाची वाट धरली. अशा आदिवासी जमाती मातृसत्ताक संस्कृती जपणाऱ्या जमाती होत. अशा जमातीमध्ये बिरसा मुंडा हे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, निसर्गपूजक, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्व होऊन गेले. बिरसा मुंडा यांचे पूर्ण नाव बिरसा सगुना मुंडा होय. त्यांच्या आईचे नाव करमी हातू असे होते. बिरसा मुंडा चे आजोबा सुगा मुंडा होते. बिरसा मुंडा चे वडील शांत, संयमी, गरीब शेतकरी होते. खुटकटी परंपरेनुसार शेती करणारे होते. वडील फारच मेहनती होते. त्यांच्याकडे काही प्रमाणात पशुधन होते. बिरसा मुंडा यांची आई प्रामाणिक, शिस्तप्रिय, शांत, मनमिळावू होती. बिरसा मुंडा कणखर, नम्र, धाडसी, बुद्धिमान, नेतृत्व गुण असलेला मुलगा होता. त्यांच्या वडिलांना तीन अपत्य होती. बिरसा मुंडा यांच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ला उलीहातू ह्या खेड्यामध्ये झाला. पूर्वी हे गाव रांची मध्ये होते. झारखंड ची निर्मिती झाल्यानंतर झारखंड राज्यात येते. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक शिक्षण सलगा गावामध्ये झाले. त्या गावातच त्यांची मावशी होती. मावशीच्या घरी राहून बिरसा मुंडांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षक जयपाल नाग यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षणासाठी जर्मन मिशनरी यांच्या माध्यमिक शाळेत झाले. जी. सी. एल. नावाच्या ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत बिरसा मुंडा माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे आले. बिरसा मुंडा यांच्या वडिलांनी मिशनरींनी शाळा सुरू करून ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार खेड्यांमध्ये केलेला होता. त्या प्रचारामुळे बिरसा मुंडांच्या वडिलांनी सुगना मुंडा यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. ख्रिश्चन धर्मीय लोक आपल्या धर्माचा स्वीकार करणाऱ्या आदिवासी जमातींना शिक्षण व वैद्यकीय सेवा पुरवित असत. त्याचप्रमाणे बीरसा मुंडा यांचे माध्यमिक शिक्षण मिशनरींच्या शाळेत झाले. बिरसा मुंडा बालपणी गुरे चालायला नेत असे. निसर्गात फिरण्याची उपजत आवड त्याला होती. जंगलामध्ये बासरी वाज विण्याचा त्याला छंद होता. त्याला नृत्य ही चांगल्या प्रकारे येत होते. आदिवासी परंपरेत सामूहिक नृत्याची परंपरा होती. तीर कामठा चालवणे या प्रकारचे छंद बिरसा मुंडा ला होते. जसा जसा बिरसा मुंडा मोठा होत गेला त्यावेळी त्याला ख्रिश्चन मिशनऱ्यांचे धर्मांतर करायचे कारस्थान समजले. बिरसा मुंडांनी पुढे माध्यमिक शिक्षण अपूर्ण सोडले. ख्रिश्चन लोक भारतामध्ये केवळ गुलामगिरी लादण्यासाठी आलेले आहेत हे त्याच्या लक्षात आले. एकीकडे भारतातील लोकांना गुलामित ठेवायचे व दुसरीकडे धर्मांतर करून आपल्या धर्माचा प्रचार करायचा.. बिरसा मुंडला ख्रिश्चन धर्माचा अनुभव आलेला होता. मिशनरींच्या शाळेत शिकल्याने त्याला इंग्रजी भाषा समजत होती. वैज्ञानिक दृष्टिकोनाने तो विचार करू लागलेला होता. काही पुस्तकांचा अभ्यास झाल्याने त्याला विवेकी ज्ञान झाले होते. अंधश्रद्धा ही ज्ञानाच्या आड येणारी काठी आहे असे ते मानत होते. शिक्षण झाल्यामुळे आदिवासींच्या जीवनामध्ये जुन्या रुढीमुळे येणारे अज्ञान वाढले होते. बिरसा मुंडा हे समाज सुधारक होते. आपल्या समाजातील लोकांनी शिक्षण घेऊन अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजे असे ते समाज बांधवांना सांगून जागृत करीत असत. समाजामध्ये एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली होती. समाजामध्ये जागृती येऊन अनेक तरुण बिरसा मुंडांच्या शब्दाला जागत होते. इंग्रजांच्या जाचक कराविरुद्ध बिरसा मुंडांनी बंड पुकारले होते. आदिवासी लोकांच्या जमिनी जमीनदारांनी लाटलेल्या होत्या. ह्या जमीनदारांविरुद्ध व इंग्रजांविरुद्ध आदिवासी लोकांची उलगुलान नावाची चळवळ बिरसा मुंडांनी उभी केली. बिरसा मुंडा यांचे पुरोगामी विचार समाजाला उच्च दर्जाची मूल्य शिकवित होते. बिरसा मुंडांनी आपल्या समाजातील चाललेल्या अंधश्रद्धा आपल्या ज्ञानाच्या साह्याने दूर केल्या. समाज जागृत होऊ लागला. जागोजागी समाजातील तरुण सामाजिक कामासाठी पुढे येऊ लागले. इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध तरुणांनी एकतेचे दर्शन दाखविले. इंग्रजांच्या रेल्वेने जाणाऱ्या मालावर हल्ले करण्याची योजना बिरसा मुंडांनी बनवलेली होती. त्यानुसार रेल गाड्यांवर उलगुलान संघटनेचे कार्यकर्ते तुटून पडत. इंग्रजांचा खजिना लुटण्याचे काम ते करीत असत. लुटलेल्या खजिन्याचा उपयोग समाजातील गरीब, वंचित, नादार लोकांसाठी बिरसा मुंडा करीत असे. ज्या लोकांना साधी भाकरी मिळत नसेल अशा लोकांना बिरसा मुंडांनी जगविले. आदिवासींचा बिरसा मुंडा जननायक बनला होता. त्यामुळे त्याला जननायक अशी उपाधी मिळाली होती. उलगुलान या शब्दाचा अर्थ म्हणजे महाविद्रोह होय. या संघटनेने इंग्रजांविरुद्ध व जमीनदार विरुद्ध महा विद्रोह केला. इंग्रजांना जेरीस आणले. जिकडे तिकडे बिरसा मुंडा यांच्या सेनेची भीती इंग्रजांना व जमीनदारांना होती. आदिवासींच्या जमिनी हडप करणारे जमीनदार यांना चांगला धडा बिरसा मुंडा यांनी शिकविला.१८८६ ते १८९० या काळात इंग्रजांविरुद्ध चाईबासा येथे मोठी चळवळ उभी केली. इंग्रज आदिवासी लोकांकडून कामे करून त्यांची मोलमजुरी देत नसत. याविरुद्ध बिरसा मुंडांनी बंड पुकारले. आदिवासींच्या जमिनीवरील कर वसूल करण्याचे काम इंग्रज भारतीय लोकांमार्फत करीत असत. अवाजवी कर कमी करण्याचे काम बिरसा मुंडांनी केले. आदिवासी लोक बिरसा मुंडांना त्यांचा भगवान मानत असत. बिरसा मुंडांनी इंग्रजांनी जमीनदारांना आदिवासींचे जमिनी कसण्याचे हक्क परत मिळवून दिले. ब्रिटिश व जमीनदार यांच्या विरोधात चळवळ उभारली. जमीनदार व ब्रिटिश यांना बिरसा मुंडा ची भीती निर्माण झाली होती. ब्रिटिश सरकारला छोटा नागपूर येथील आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी टेनन्सी ऍक्ट पास करून संरक्षण देण्यास बिरसा मुंडांनी भाग पाडले. बिरसा मुंडा यांचा इंग्रजांवर चांगलाच दरारा होता. बिरसा मुंडा सरकारी कचे ऱ्यांवर अचानक हल्ला करीत असे. बिरसा मुंडा हे स्वातंत्र्य सेनानी होते. बिरसा मुंडा क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. ते जहाल प्रवृत्तीचे होते. आदिवासींना सावकारीच्या जाळ्यात अटकून जमीनदार त्यांच्या जमिनी हडप करून घेत असत. बिरसा मुंडा यांनी केलेल्या चळवळीमुळे आदिवासींच्या जमिनी कोणालाही नावे करता येत नाही. आज सुद्धा आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांच्या नावावर होत नाही. आदिवासी समाज निसर्गरक्षक आहे. त्यांनी सांभाळलेला निसर्ग बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी आदिवासींच्या प्रांतात जातो. आदिवासींची समतावादी विचारसरणी चांगल्या लोकांना भुरळ घालते. आदिवासींनी जंगले सांभाळून ठेवली आहेत. आदिवासींच्या जंगलांवर भांडवलदारांचे हल्ले थांबलेले नाहीत. त्यांच्या जंगलातून लाकूडतोड होऊन भांडवलदार मालामाल होत आहेत. आजही बिरसा मुंडा सारख्या क्रांतिकारकाची गरज आहे. मुंडा ही एक आदिवासी जमात आहे. ही जमात छोटा नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात तसेच झारखंड, त्रिपुरा, छत्तीसगड या भागात आढळते. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. बिरसा मुंडा आदिवासी जमातीचा जननायक आहे. बिरसा मुंडांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. बिरसा मुंडा यांना पकडण्यासाठी ५०० रुपये इनाम म्हणून ठेवलेले होते. बिरसा मुंडा भूमिगत पद्धतीने राहुन भारत मातेची सेवा करीत होते. अचानक ब्रिटिशांवर होत असलेला हल्ला यामुळे ब्रिटिश दास्तावलेले होते. बिरसा मुंडा यांनी उभी केलेली सेना त्यामध्ये असंख्य सैनिक होते. सामान्य लोकांचे कोणतेही नुकसान न करता उल गुलान ही संघटना काम करीत होती. शिवाजी महाराजांप्रमाणे आदिवासी जमातींना एकत्रित करून बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. आदिवासी जमातीमधून बिरसा मुंडा हा पहिला जननायक ठरला. आदिवासींची अस्मिता म्हणजे बिरसा मुंडा होय. आदिवासींचे हक्क व अधिकार मिळवून देणारा न्यायदाता बिरसा मुंडा होय. आदिवासींना तलवारी व तीर कामठा यांचे प्रशिक्षण देऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी बिरसा मुंडा यांनी सेना उभारली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीला १५० वर्ष झाले. बिरसा मुंडा २५ वर्ष जगले. इंग्रजांनी लावलेल्या बिरसा मुंडा ला पकडण्यासाठी ५०० रुपयाच्या इनामाला काही फितूर झालेत. बिरसा मुंडा ला चक्रधरपुर येथे अटक झाली. सामान्य झोपडीत राहणारा बिरसा मुंडा इंग्रजांच्या तावडीत सापडला. बिरसा मुंडाला रांची येथील तुरुंगात नेण्यात आले. बिरसा मुंडा ला तुरुंगात योग्य उपचारही केले नाही. आदिवासी मध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवणारा खरा क्रांतिकारी ९ जून १९०० ला हे जग सोडून गेला. आजही आदिवासींच्या जमिनी भडकविण्याची षडयंत्र राजकीय नेते व भांडवलदार करीत आहे. लवासासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना कवडीमोल मूल्य देऊन त्यांच्या जमिनी बळकविल्या जातात . आदिवासींच्या जीवावर तेथील कामे करून घेतली जातात. आदिवासींनी बाबासाहेबांनी सांगितलेला व बिरसा मुंडा ची स्मरण करून आपल्यामध्ये स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *