
पुसद प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील मांडवा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३१व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना तालुका पुसद व मांडवा शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने वही,उजळणी, कंपाउस तथा आदी शालेय साहित्याचे वाटप करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत खंदारे तालुका अध्यक्ष हे होते. तर प्रमुख पाहुणे विजय राठोड उपसरपंच, कैलास भरगाडे मुख्याध्यापक, संदीप आबाळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,देविदास गजभार तालुका उपाध्यक्ष, गजानन वंजारे शहराध्यक्ष, सोनू घोडेकर शहर उपाध्यक्ष, साहिल कांबळे विद्यार्थी आघाडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शशांक खंदारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आकाश नेटके, विजय तायडे, राहुल वायदंडे, सचिन वंजारे, सुमित वंजारे, नागेश पवार, बाबा पवार, आकाश पडोळे, समीर खान, गजानन बोखारे, गोलू बोखारे, सम्राट गजभार, श्याम आठवले, रोहन गजभार, शैलेश जाधव, दुर्गेश जाधव, निखिल गजभार,शिक्षक वृंद,व विद्यार्थी तसेच इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन वंजारे यांनी केले तर शिक्षक गजेंद्र थोरात यांनी आभार मानले.








