
वाशिम जिल्हा:
शेंदुरजना ते रुई या रस्त्यावर संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान एका दुचाकीस्वाराचा नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात झाला. अपघातात जखमी झालेला व्यक्ती वटफळ गावचा रहिवासी असून तो पूर्णपणे रक्ताने माखलेला अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. घटनास्थळी अनेक जण ये-जा करीत होते, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भाऊ यांनी आपल्या मित्रांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी शेंदुरजना येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील ॲम्बुलन्स चालक राजू भाऊ यांना संपर्क साधला. कॉल मिळताच राजू भाऊ केवळ पाच मिनिटांत ॲम्बुलन्ससह घटनास्थळी दाखल झाले.
जखमीला तातडीने आरोग्य वर्धिनी केंद्र, शेंदुरजना येथे नेण्यात आले. तेथे डॉ. शिंदे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परतेने प्राथमिक उपचार केले. मात्र रुग्णाची प्रकृती बिघडू लागल्याने पुढील उपचारासाठी त्याला वाशीम जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
समयसूचकता, धाडसी मदतभाव आणि आरोग्य सेवकांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचविण्यास मोठी मदत झाली. या सर्व मदतकर्त्यांचे भाऊ यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
“आपल्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे एखाद्या कुटुंबाचे सुख अबाधित राहिले. आपण समाजासाठी सदैव तत्पर राहूया,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.








