कनेरवाडी वार्ता
युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल रंगराव कुरमे यांना नियत वयोमानानुसार भावपूर्ण सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवक मंडळाचे सचिव विजय भाऊ के. जाधव अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे युवक मंडळाचे सदस्य देव भाऊ जाधव, प्राचार्य कु. वंदना पोले, पूजा ताई जाधव हे होते.
मुख्याध्यापक कुरमे यांनी सलग तेहतीस वर्षे शिक्षक म्हणून व एका वर्षाचा मुख्याध्यापक म्हणून अनेक उपक्रम शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबविले. विद्यार्थ्याकरिता कलादालन, व्यायाम शाळा , अभ्यासिका शाळेत स्थापन करून विद्यार्थ्यांना उपक्रमाची जाणीव करून दिली त्याबद्दल सचिव विजय जाधव यांनी त्यांची अभिनंदन व कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राठोड यांनी केली तर आभार प्रा. कु. रश्मी डेकाटे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या विषयाकरिता राजेश बुरबुरे, प्रा.नरेश राठोड,प्रा. शेषराव राठोड, अभिजीत राठोड,बाळासाहेब कराळे, संजय राठोड,विष्णू इंगळे, भूमेश्वर डोक, विजय राठोड, महेश चव्हाण, पांडुरंग जाधव,अमोल राठोड, विलास चिकणे , युवराज जाधव यांचे अथक परिश्रम लाभले.








